न्यूयॉर्क : भारताने आपल्या मिशन वर्ल्ड कपची विजयाने सुरुवात केली. भारताने सुरुवातीला आयर्लंडचा ९७ धावांत खुर्दा उडवला. त्यानंतर रोहित शर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने सहजपणे विजय साकारला. भारताच्या गोलंदांनी अचूक आणि भेदक मारा करत विजयाचा पाया रचवला. त्यानंतर रोहित शर्माने धडाकेबाज फटकेबाजी करत त्यावर कळस चढवला. त्यामुळे आता भारताचा संघ पाकिस्तानच्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्माने या सामन्यात ३७ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर ५२ धावांची कर्णधाराला साजेशी खेळ साकारली. पण त्यानंतर तो जखमी निवृत्त झाला. पण रोहितने आपले काम चोख चबजावले आणि त्यामुळे भारताला ८ विकेट्स राखून सहजपणे विजय मिळवता आला. ऋषभ पंतने (नाबाद ३६) विजयी षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.भारतापुढे विजयासाठी ९७ धावांचे माफक आव्हान होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे सलामीला येणार होते. त्यामुळे हा सामना भारत १० विकेट्स राखून जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण भारताला यावेळी विराट कोहलीच्या रुपात पहिला धक्का बसला. आयर्लंडच्या मार्क एडरने यावेळी तिसऱ्या षटकात विराट कोहलीला बाद केले. कोहलीला यावेळी फक्त एकच धाव करता आली. कोहली बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमाकांवर फलंदाजीला कोण येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. भारतीय संघाने यावेळी ऋषभ पंतला तिसऱ्या स्थानावर बढती दिली. रोहित शर्माने यावेळी ५२ धावा केल्या, पण त्यानंतर दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर फलंदाजीला आलेला सूर्यकुमार यादव दोन धावांवर बाद झाला.ऋषभने यावेळी तिसऱ्या स्थानावर येत रोहित शर्माला चांगली साथ दिली. रोहित शर्मा या सामन्यात दमदार फटकेबाजी करत होता. खेळपट्टीवर संथ गतीने चेंडू येत होते आणि त्यामुळे फलंदाजी करणे सोपे नव्हते. पण रोहित शर्माने संयतपणे फलंदाजी केली. रोहितने यावेळी चौकारासह आपले अर्धशतक साजरे केले. रोहितने यावेळी ३६ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि विजयाचा मार्ग प्रशस्थ केला. भारताने टॉस जिंकला आणि रोहित शर्माने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा विश्वास सार्थ ठरवला. अर्शदीप सिंगने एकाच षटकात आयर्लंडच्या दोन फलंदजाांना बाद केले आणि त्यांची २ बाद ९ अशी अवस्था केली. त्यानंतर हार्दिक पंड्याने तीन विकेट्स मिळवल्या आणि आयर्लंडचे कंबरडे मोडले. त्यामुळे भारताने आयर्लंडला ९६ धावांत रोखले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/H1Neyjr
No comments:
Post a Comment