Breaking

Tuesday, June 25, 2024

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटी प्रकरण; दुसऱ्या आरोपीला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी https://ift.tt/uDUGFA9

ऋषी होळीकर, लातूर: संदर्भात चार जणांविरोधात लातूर येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. यामध्ये जामिल पठाण याला २ जुलैपर्यंत न्यायालयात हजार केले असता त्याला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. आज दुसरा आरोपी संजय जाधवला न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी २ जुलै पर्यंत पोलीस कोठडीची मागणी केली. यात न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर संजय जाधव याला दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. संबंध देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव यास २ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नीट परीक्षा पेपर फुटीचे प्रकरण लातूरपर्यंत पोहचले. लातूर येथे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परीक्षा पेपर फुटी प्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सुरुवातीस जलील उमरखाँ पठाण, कातपूर जि. प. प्रशाला शिक्षक यास न्यायालयाने काल २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. काल दुपारनंतर या प्रकरणातील दुसरा आरोपी जो चाकूर तालुक्यातील बोथी तांडा येथील रहिवाशी आहे.सोलापूर जिल्ह्यातील टाकळी जिल्हा परिषदमध्ये शिक्षक आहे. यास अटक करण्यात आली होती. आज त्याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने जाधव यास देखील २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात लातूर पोलिसांनी जलील उमरखाँ पठाण, संजय तुकाराम जाधव, ईरण्णा मष्णाजी कोंगलवार आयटीआय शिक्षक उमरगा आणि गंगाधर मुढे रा. दिल्ली, अशा चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीस पठाण यास अटक केली. त्यानंतर काल संजय जाधव यास अटक केली. या प्रकरणात उर्वरीत दोन आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे, असे सांगण्यात येते. या तपासादरम्यान या प्रकरणात आणखी कोणी संशयित सहभागी आहेत का? या छडा लागणार आहे. दरम्यान, वरील गुन्हेगाराशी संपर्कात असणारे, त्यांच्याशी व्यवहार करणारे अन्य काही जण संशयित असू शकतात. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु असल्याचे समजते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/q4X0LCo

No comments:

Post a Comment