Breaking

Monday, June 24, 2024

Pune News: रील्स बनवण्यासाठी अल्पवयीन मुलांनी फोडल्या गाड्या, दहशत माजवण्याचा प्रयत्न, पिंपरी चिंचवडमधील घटना https://ift.tt/FBR2hVN

पिंपरी, पुणे: पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड हे देखील गुन्हेगारीचे हब बनताना पहायला मिळत आहे. पुण्यातील वाहने फोडीची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरातून पाच ते सहा अल्पवयीन मुलांनी वाहने फोडल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय वाहने फोडत असताना मोबाईलमध्ये रील्स बनवताना देखील ते पहायला मिळत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाकड परिसरातील थेरगाव भागात साधारण सोमवारच्या मध्यरात्री अल्पवयीन मुलांनी कोयत्याने पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून मोठं नुकसान केलं आहे. थेरगाव परिसरात घडली आहे. हा प्रकार वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत पसरवण्याचे प्रकार शहरात वारंवार घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. थेरगाव भागातील एकता कॉलनी परिरात ही घटना घडली आहे. वाकड पोलिसना हा प्रकार समजल्यानंतर तात्काळ पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला आहे. पोलिसांनी त्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे. मागील काही दिवसांपासून शहरात वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. मात्र, आता पुन्हा तोडफोडीनं डोकं वर काढल्याने सामान्य नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत. अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण आपले वर्चस्व दाखवण्यासाठी कोणत्याही थराला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीला आळा बसवन्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे या संदर्भात पोलीस काय ठोस पाऊले उचलतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/EmaV7cj

No comments:

Post a Comment