Breaking

Monday, July 29, 2024

मनू भाकेर भारताला मिळवून देऊ शकते दुसरं ऑलिम्पिक पदक, कधी आणि कसं जाणून घ्या... https://ift.tt/4S0d8Yg

पॅरिस : मनू भाकेर... हे नाव भारतामध्ये तरी कोणी विसरू शकत नाही. कारण मनू भाकेरने भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक जिंकवून दिलं. त्यानंतर अद्याप भारताला या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आलेले नाही. पण आता हीच मनू भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील दुसरे पदक जिंकवून देऊ शकते. मनू भारताला दुसरे पदक कधी आणि कसे जिंकवून देऊ शकते, हे आता समोर आले आहे.मनूने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात रविवारी कांस्यपदक पटकावले. मनूने या पदकासह इतिहास रचला. कारण भारताकडून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. मनूने फक्त २२ व्या वर्षी ही देदिप्यमान कामगिरी केली आहे. पण मनू ही फक्त या एकाच पदावर थांबेल, असे सध्या तरी दिसत नाही. कारण भारताला दुसरे पदक मनू हीच जिंकवून देऊ शकते, असे आता समोर आले आहे.मनूची स्पर्धा आता मंगळवारी होणार आहे. मनू यावेळी विभागात पुन्हा उतरणार आहे, पण यावेळी ती मिश्र दुहेरी गटात उतरणार आहे. मनूबरोबर यावेळी सरबजोत सिंग सहकारी म्हणून असणार आहे. मनू आणि सरबजोत हे दोघे १० मीटर एअर पिस्तुलमध्ये मिश्र दुहेरीच्या प्रकारात उतरणार आहेत. मनू आणि सरबजोत यांना यावेळी कांस्यपदक पटकावण्याची संधी असणार आहे. ही लढत भारतीय वेळेनुसार दुपारी १.०० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे रविवारनंतर आता मंगळवारी मनू भारताला दुसरे कांस्यपदक जिंकवून देऊ शकते. त्यामुळे आता मंगळवारी सर्वांची नजर ही मनूवर लागलेली असेल. मनू आता भारताला दुसरे पदक जिंकवून देते का, याची उत्सुकता आता सर्वांना असणार आहे.मनूने टोकियो ऑलिम्पिकनंतर सोडण्याचे ठरवले होते. पण ती पुन्हा या खेळाकडे वळली आणि इतिहास लिहीला. मनू ही भारताची पहिलीच महिला ठरली जिने भारताला पदक जिंकवून दिले. पण आता एकाच ऑलिम्पिकमध्ये मनू भारताला दुसरे पदक जिंकवून देऊ शकते. त्यामुळे आता मंगळवारी मनू आणि सरबजोत हे कशी कामगिरी करतात आणि भारताला दुसरे पदक जिंकवून देतात का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असेल.मनूने तर भारताला एक पदक जिंकवून दिले आहे. आता सरबजोत मनूला कशी साथ देतो आणि त्यांची कांस्यपदकाच्या लढतीत कशी कामगिरी होते, याकडे भारतीय चाहते डोळे लावून बसलेले असतील.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/nm38Pux

No comments:

Post a Comment