Breaking

Sunday, July 28, 2024

शुभमन गिलची दुखापत बनली संजूसाठी संधी, जाणून घ्या उपकर्णधाराचं संघाबाहेर राहण्याचं कारण... https://ift.tt/rRQh5GK

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. उपकर्णधार सलामीवीर शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. सध्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात संजू सॅमसनला खेळवण्यात आले नव्हते. गिलने मानेवर दुखापत झाल्याची तक्रार केली. त्यानंतर तो दुसऱ्या टी-२० सामन्यातून बाहेर पडला. ३ सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ १-० ने पुढे आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला.भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, 'आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. हवामान थोडे अनुकूल असून दुसऱ्या डावात विकेट चांगली राहण्याची अपेक्षा आहे. तुम्ही एखादा खेळ जिंकलात तरीही, सुधारणेला नेहमीच जागा असते, तुम्ही शिकत राहता आणि सुधारता. गिल बाहेर आहे. कारण त्याने मानेच्या दुखापतीची तक्रार केली होती. सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. गिल टीम इंडियात सलामीवीर म्हणून खेळतो. मात्र आता तो नसल्यामुळे त्याच्या जागी यशस्वी जैस्वाल यांच्यासोबत कोण सलामी देणार हा प्रश्न आहे. संजू हा खेळाडू आहे जो हे काम करू शकतो. हा उजव्या हाताचा फलंदाज कोणत्याही क्रमाने फलंदाजी करू शकतो. अशा परिस्थितीत संजू यशस्वीसोबत ओपन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यशस्वीसोबत गौतम गंभीर ऋषभ पंतलाही सलामीची संधी देऊ शकतो. पंतने यापूर्वीही सलामी दिली आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेनेही आपल्या संघात बदल केला आहे. मधुशंकाच्या जागी ऑफस्पिनर रमेश मेंडिसला संघात स्थान मिळाले आहे. यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत १६१ धावा केल्या. भारताला मालिका जिंकण्यासाठी १६२ धावा कराव्या लागतील. मात्र टीम इंडियाच्या खेळीवेळी पावसाने सामन्यात व्यत्यय आणला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/jRmE5DC

No comments:

Post a Comment