Breaking

Saturday, July 20, 2024

अतिवृष्टीचा 'या' जिल्ह्याला फटका! नद्यांना पूर अन् घरांची परझड, पुराच्या पाण्यात चिमुकला वाहून गेला https://ift.tt/fidyK4I

चंद्रपूर: जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. याचा फटका जिल्हातील सोमणपल्ली गावाला बसला आहे. शेतात असलेल्या बोडीतील पाणी थेट घरात शिरले. घरातील अन्नधान्याची नासाडी झाली आहे. घरात गुडघाभर पाणी असताना त्याच घरात कुटुंबीय झोपी जात आहेत. ग्रामपंचायतीने गावातील नाल्यांच्या उपसा केला नाही. त्यामुळे पाण्याच्या विसर्ग होण्यास अडथळा निर्माण होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्याला ४८ तास पावसाने झोडपून काढले. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच इरई धरणाचे सात दरवाजे एक मिटरने उघडले गेले आहेत. त्यामुळे परिस्थिती पुन्हा बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाचे दरवाजे उघडल्याने चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठावर शेती असलेल्या बळीराजाची धाकधूक वाढली आहे. इरई धरणाचे सात आणि गोसीखुर्द धरणाचे २१ दरवाजे आज उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा आणि वर्धा नदीचे पात्र भरले आहे. या दोन्ही नदी काठावर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती आहे. नदीला पूर आला की दरवर्षी या शेतीचे मोठे नुकसान होत असते. त्यामुळे आता पूर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजाची धाकधूक वाढली आहे.जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुल तालूक्यातील १८ घरे आणि गुरांचा गोठ्यांची पडझड झाली आहे. तालुक्यातील चीरोली मंडळ साजा येथील ३ घरे, कांतापेठ साजा ४ घरे, नलेश्वर साजा २ घरे, सुशी दाबगाव साजातील ४ घरांची पडझड झाली असून केलझर येथील १ गुरांचा गोठा, तसेच बोरचांदली २, टेकडी १, जुनसुरला १, चांडापुर १, गडीसूर्ला २, भवराला गोठा १ येथे नुकसान झाले आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात एक १३ वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील विलम या गावातील हा मुलगा असून रुणाल बावणे असे या मुलाचे नाव आहे. गावालगत आलेला पूर बघण्यासाठी तो गावकऱ्यांसोबत नाल्यावरील पुलाकडे गेला. पाण्यात खेळताना त्याचा तोल गेला आणि प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी पोहचत शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/vWLDsUI

No comments:

Post a Comment