सातारा (संतोष शिराळे) : तब्बल अकरा दिवसांच्या शोधमोहिमेनंतर केळवली धबधब्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला यश आले. या टीमची मुसळधार पावसातही शोध मोहीम सुरू असताना बुधवारी सायंकाळी उशिरा धबधब्यापासून साडेचार ते पाच किलोमीटर अंतरावर युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर गुरुवारी सकाळी सात वाजता शोधमोहीम सुरू करून सहा ते सात तासांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढला. युवकाचा मृतदेह पुढील सोपस्कारासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ऋषिकेश रमेश कांबळे (वय २२, रा. दूधगंगा कॉलनी, सैदापूर, कराड) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. ऋषिकेश हा केळवली धबधब्यात बुडाल्याचे माहिती त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत माहिती अशी की, रविवार, दि. ३० जून रोजी दुपारच्या सुमारात पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती. त्यातील काही तरुण धबधब्याच्या खोल डोहात पोहण्यासाठी उतरले असता त्यातील एक तरुण पाण्यात बुडून बेपत्ता झाला आहे, अशी माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यात मिळाली. या घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्याला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर दाखल झाली. घटनास्थळाची पाहणी करून शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम शोध कार्याला सुरुवात केली. मात्र, धबधब्याचा वरून पडणाऱ्या तीव्र प्रवाहामुळे शोध कार्याला अडथळे येत होते. शोध कार्यासाठी डोहात गेल्यानंतर बोट पाण्याने भरत होती. त्यामुळे युवकाचा शोध घेणे अवघड होत होते. सलग तीन ते चार दिवस शोध घेतला. मात्र, तपास लागला नाही. अखेर ११ दिवसाच्या प्रयत्नानंतर शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.केळवली धबधब्यापासून सुमारे साडेचार किलोमीटर अंतरावर एका खोल दरीमध्ये युवकाचा मृतदेह अडकलेला होता. तो बाहेर काढण्यासाठी दरीत रेस्क्यू टीम उतरली असता पाण्यामधून वाहून आलेला एक मोठा दगड अंगावर येऊन पडला असल्याने मृतदेह काढण्यास अडचण निर्माण झाली होती. सकाळी रेस्क्यू टीमला एका नवीन संकटाला सामोरे जावे लागले, पण त्यातून या टीमने मार्ग काढत त्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी सुमारे सहा ते सात तास कसरत करावी लागली. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम गेल्या ११ ते १२ दिवस प्रयत्नांची पराकाष्टा केली. या टीमने केळवली धबधब्यापासून उरमोडी धरण पात्रात बोटिंग करत बुडालेल्या युवकाची शोध मोहीम घेतली. या रेस्क्यू टीमने तब्बल दहा ते अकरा दिवस अथक परिश्रम घेऊन दररोज पाठपुरावा केला, तो मृतदेह शोधण्यासाठी दिवस-रात्र केली. केळवली परिसरात मुसळधार पाऊस असल्याने ही शोध मोहीम मध्येच थांबवली जाईल असे वाटले असतानाच शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने गेले दहा-अकरा दिवस शोध मोहिमेत सातत्य ठेवले आणि अखेर त्यांना बुधवारी यश आले. केळवली धबधब्यापासून सुमारे साडेचार ते पाच किलोमीटर अंतरावर हा मृतदेह रेस्क्यू टीमला मिळून आला. मात्र, रात्री उशीर झाल्यामुळे ही मोहीम गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू करण्यात आली. अखेर साडेसहा ते सात तासाच्या परिश्रमानंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात या टीमला यश आले. अत्यंत सडलेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याने दुर्गंधी सुटली होती. मात्र, रेस्क्यू टीमने काळजी घेत हा मृतदेह बाहेर काढला. पुढील सोपस्कारासाठी युवकाचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.केळवली धबधबा ठिकाणी असणारा मुसळधार पाऊस, वादळ- वारा, शोध मोहिमेसाठी करावी लागणारी पायपिट अशा खडतर परिस्थितीत प्रसंगावधान राखत हे रेस्क्यू पूर्ण केले. या शोध मोहीमसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, सातारा पोलीस दल, केळवली ग्रामस्थ, पोलीस पाटील यांनी रेस्क्यू टीमला सहकार्य केले. या शोध मोहिमेला यश आल्याने शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/mu07UfR
No comments:
Post a Comment