Breaking

Wednesday, July 10, 2024

विधानसभेत दगाफटका टाळण्यासाठी भाजपमध्ये झाडाझडती सुरू; अनेकांना मिळणार नारळ https://ift.tt/a9RjAwd

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर लोकसभा निवडणुकीतील मताधिक्य घटल्यानंतर भारतीय जनता पक्षाने विधानसभा मतदारसंघांच्या बुथनिहाय आढावा बैठकांमध्ये झाडाझडती सुरू केली. नेते व पदाधिकाऱ्यांना परस्परांवर खापर फोडत आहेत. विधानसभेत दगाफटका टाळण्यासाठी फेरबदल सुरू झाले. निष्क्रियांना नारळ देण्यात येत असून येत्या २५ जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जाणार आहे. भाजपने बराच गाजावाजा करून पेज, बुथ, शक्ती केंद्र प्रमुख नियुक्त केले पण, त्याचा फारसा परिणाम मताधिक्यात दिसून आला नाही. उलट कमी झाले आणि ग्रामीणच्या विचार केल्यास महायुतीची रामटेकची जागा गेली. शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्यासह ज्येष्ठ नेते, आमदार, मंडळ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र चालले आहे. मताधिक्य कमी होण्यास जबाबदार कोण, याचाही अभ्यास करण्यात आला. यासाठी २०१९ व २०२४ सालच्या निवडणुकीतील कामगिरीची तुलना करण्यात आली. बंटी कुकडे यांनी पश्चिम नागपुरातील संपूर्ण बुथ प्रमुख यंत्रणा, शक्ती केंद्र प्रमुख तत्काळ बरखास्त करण्याची सूचना मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे यांना केली आहे. २५ जुलैपर्यंत दोन्ही पातळीवर नियुक्त्या करण्याची मुदत दिली आहे. अशीच प्रक्रिया अन्य पाचही विधानसभा मतदारसंघात राबवण्यात येत आहे. तथापि, चांगली कामगिरी करणाऱ्यांना कायम ठेवून निष्क्रियांना पायउतार केले जात आहे. या महिन्याअखेरीस ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नव्या दमाने विधानसभा निवडणुकीची तयारी केली जाणार आहे. सर्वे, मुलाखतीनंतर उमेदवारी- नाना पटोले विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. इच्छुकांकडून अर्ज आल्यानंतर सर्वे व मुलाखतीच्या आधारे उमेदवार निश्चित करण्यात येतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. जागा वाटपाची चर्चा लांबल्याची कबुल्याची कबुलीही त्यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. काँग्रेसने सर्व २८८ जागांवर इच्छुकांकडून अर्ज मागवले असून स्थानिक पातळीवर वाटप व स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात अद्याप जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे विद्यमान आमदार वगळता तिन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. याबाबत बोलताना पटोले म्हणाले, विधिमंडळ अधिवेशन आणि विधान परिषद निवडणुकीमुळे महाआघाडीतील वाटाघाटीची चर्चा लांबली. यानंतर लगेच चर्चा करून जागांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात येईल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/khxPeIU

No comments:

Post a Comment