Breaking

Wednesday, July 17, 2024

भारतीय संघापूर्वी जय शाह श्रीलंकेत का होणार दाखल, समोर आलं आता मोठं कारण... https://ift.tt/QeEBXy1

नवी दिल्ली : टी २० वर्ल्ड कपनंतर आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआयचे सचिव मात्र कोलंबोमध्ये दाखल होणार आहेत. या गोष्टीचं एक मोठं कारण आता समोर आले आहे.भारताचा श्रीलंकेचा दौरा हा २७ जुलैपासून सुरु होणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात सुरुवातीला ३ टी २० सामने खेळणार आहे. त्यानंतर भारत आणि यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भारताचा संघ हा २२ जुलैला श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. पण भारतीय संघाच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १९ जुलै या दिवशी जय शाह हे श्रीलंकेत दाखल होणार आहेत.जय शाह हे श्रीलंकेत भारतीय संघापूर्वी दाखल होणार आहेत ते बैठकींसाठी. कारण श्रीलंकेतील कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या () काही महत्वाच्या बैठकी होणार आहेत. यावेळी पाकिस्तानमधील चॅम्पियन्स ट्रॉफीबाबतची चर्चा केली जाऊ शकते. कारण यावेळी भारतासह पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे पदाधिकारीही यावेळी येथे उपस्थित असणार आहेत. त्यामुळे यावेळी भारत पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी का तयार नाही, या विषयावरही चर्चा होऊ शकते. पाकिस्तानने भारताचे सर्व सामने हे लाहोरमध्ये आयोजित केले होते. भारत लाहोरमध्ये तरी सामने खेळण्यास येईल, असे पाकिस्तानला वाटत होते. पण त्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळायसा जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्यावेळी बीसीसीआयने भारतीय सरकार सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी देत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाची आगपाखड पाहायला मिळाली होती. कारण त्यांनी त्यानंतर बीसीसीआयला याबाबत लेखी पत्र द्यायला सांगितले होते, जे बीसीसीआयने अद्याप त्यांनना दिलेले नाही. त्यामुळे याबाबतचा काही निर्णय श्रीलंकेत होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.आयसीसीची एक महत्वाची बैठक श्रीलंकेतील कोलंबो येथे होत आहे. या बैठकीत वर्ल्ड कप आणि महत्वाच्या स्पर्धांबाबत चर्चा करण्यात येणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fTc1zrj

No comments:

Post a Comment