Breaking

Thursday, July 18, 2024

आमच्यात उत्साह जास्त, काहीजण बोलून गेले असतील; विधानसभा उमेदवारीवर युगेंद्र पवारांची सूचक प्रतिक्रिया https://ift.tt/4xs8GDy

(दीपक पडकर ) : आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीतून हे आमदार असतील असा उल्लेख वक्त्यांच्या भाषणातून झाला. या संदर्भात युगेंद्र पवारांना विचारले असता ते म्हणाले की, याबाबतचा निर्णय महाविकास आघाडी व मित्रपक्ष तसेच पवार साहेबांचा असेल असे उत्तर त्यांनी दिले.विधानसभेसाठी बारामतीतून युगेंद्र पवार याच नावाची चर्चा होत आहे याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, जर तरचे हे प्रश्न आहेत. लोकांकडून ही मागणी आली पाहिजे.जर लोकांची इच्छा असेल तर तर त्यांच्यासाठी आपण पुढे काम करायचे आहे की नाही. हे सर्वांशी बोलून ठरवावे लागेल. भावी आमदार या आशयाचे एक फलक बारामतीत झळकत आहेत याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, आपले सगळे कार्यकर्ते नवीन आहेत. मी पण नवीन आहे. आम्ही सर्व तरुण आहोत. आमच्यात उत्साह जास्त आहे. त्यामुळे काहीजण बोलून गेले असतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यांनी दिली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीच्या निमित्ताने आज बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुढाकारातून व राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता.

'जागरण साहेबांचं' 'बोकड' साहेबांची, वाढप्या कोणाला तरी ठेवलं...

माळशिरसमधून उत्तम जानकर तर बारामतीतून युगेंद्र पवार हे आमदार असतील, असं वक्तव्य उत्तम जानकर यांनी बारामतीतील मेळाव्यात केले. या संदर्भात त्यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, बारामतीत गेली पन्नास वर्ष पवार साहेबांनी जो उमेदवार दिला. तोच उमेदवार निवडून येतो. जागरण साहेबांचं बोकड साहेबांची, वाढप्या कोणाला तरी ठेवलं. म्हणून काय तो जागरणाचा मालक होत नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी साहेब जो उमेदवार देतील तोच निवडून येईल, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा लगावला.

सरकारला हे मान्य करावं लागले की, लाडकी ही बहीणच असते...

बहिण आणि सून हा बारामती पासून सुरू झालेला वाद तुम्ही इथपर्यंत आणला आहे की, महाराष्ट्र सरकारला हे मान्य करावं लागले की, लाडकी ही बहीणच असते. आणि तिच्यासाठी योजना आणल्याशिवाय कुणालाच पुढे जाता येत नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर दाखवलेला विश्वास मुलगी म्हणून, एक बहीण म्हणून जो विश्वास तुम्ही दाखवला.तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने बघितला. असं म्हणत बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लेक की सून या मुद्द्याचा उल्लेख करत रोहिणी खडसे यांनी आपल्या मोजक्या शब्दातील भाषण गाजवले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/jkSzDx3

No comments:

Post a Comment