कोलंबो : कोहली वनडे मालिकेपूर्वी श्रीलंकेत दाखल झाला आहे. विराट श्रीलंकेत पोहोचला आणि त्याने सराव करायला सुरुवात केली. पण त्यावेळी विराट चाहत्यावर चांगलाच भडकला होता, असे कायला मिळत होते. पण विराट खरंच भडकला होता का, हे तुम्हाला दोन व्हिडिओ पाहून ठरवता येऊ शकते.
नेमकं काय समोर आलं होतं...
विराट कोहली हा श्रीलंकेतील ड्रेसिंग रुममध्ये सराव करत होता. यावेळी विराटच्या हातामध्ये एक बॅट होती. तो यावेळी फलंदाजीचा सराव करत होता. विराटचा हा सराव एक चाहता पाहत होता. विराट जेव्हा सराव थांबवतो तेव्हा हा चाहता त्याला चोकली.... चोकली.... असे चिडवल्याचे ऐकायला मिळते. त्यानंतर विराटचा मूड बदलतो आणि तो रागावतो, असे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत होते.दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळत आहे...
विराट कोहलीचा हा दुसरा व्हिडिओ सारखाच आहे. विराट सराव करताना दिसत आहे. ड्रेसिंग रुममध्ये त्याचा वावर आहे. तो फलंदाजीचाच सराव करत आहे. त्याचा हातात एक बॅट आहे. कोहली सराव थांबवून चाहत्याकडे वळून पाहताना ही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण यावेळी विराटला कोणीही चिडवत नाही. कोहलीला चोकली... चोकली... असं कोणीही बोलताना ऐकायला मिळत नाही.नेमकं खरं काय आहे....
विराट कोहली हा श्रीलंकेत दाखल झाला आहे. पण विराट कोहली जेव्हा श्रीलंकेत दाखल झाला,त्या दिवशीचा सराव रद्द करण्यात आला होता. त्यानंतर कोहलीने फलंदाजीचा सराव केला असल्याचे म्हटले जात आहे. पण विराट कोहलीच्या कोणत्याही सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर अपलोड केलेला नाही. पण चाहत्यांनी कोहलीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. काही जणांनी हे व्हिडिओ एटिड करून त्याला वेगळा रंग देण्याचे कामही केले आहे. त्यामुळे कोहलीला कोणीही चिडवले नसून तो कोणत्याही चाहत्यावर भडकला नसल्याचेच समोर येत आहे.सध्याच्या घडीला नामांकित खेळाडूंना ट्रोल करण्याची फॅशन सुरु झाली आहे. त्यामध्ये ओरिजनल व्हिडिओ एटिड केले जातात आणि त्या खेळाडूला बदनाम केले जाते. कोहलीबाबतही हीच गोष्ट घडत असल्याचे दिसत आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/XQTPG0I
No comments:
Post a Comment