Breaking

Tuesday, July 16, 2024

सकाळी मजुरीसाठी निघाल्या, रेल्वे ट्रॅकवर अनर्थ; आईच्या निधनानंतर दोन लेकरांचा काळीज पिळवटणारा आक्रोश https://ift.tt/Yo6MXhu

निलेश पाटील, जळगाव : सध्या शेतीच्या कामाला जोर धरू लागला असल्याने महिला वर्ग शेतामध्ये कामासाठी सकाळीच घराच्या बाहेर पडत आहेत. जळगाव शहरातील आसोदारोड परिसरात राहणाऱ्या ३६ वर्षीय अलका कोळी या शेतात जाण्यासाठी रेल्वेरुळ ओलांडत होत्या. मात्र धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अलका विजय कोळी, वय ३६, रा. श्रीराम चौक, असोदा रोड जळगाव असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. या घटनेबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी शेतामध्ये मजुरी करण्यासाठी अलका कोळी निघाल्या होत्या. असोदा रेल्वे गेट ओलांडत असताना रेल्वेचा जबर धक्का लागल्याने ३६ वर्षे विवाहित महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर काही महिला थोडक्यात बचावल्या आहेत.जळगाव शहरातील आसोदा रोडवरील श्रीराम चौकात अलका कोळी या आपल्या पती आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. त्यांचे पती विजय कोळी हे महावितरणमध्ये वायरमन आहेत, तर अलका कोळी या शेतमजुरी करण्याचं काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी त्या इतर मजुरांसोबत शेती कामासाठी निघाल्या होत्या, मात्र वाटेत काळाने घाला घातला आणि मंगळवारी १६ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.दरम्यान, आसोदा रेल्वे गेट जवळ रेल्वेरूळ ओलांडतांना अचानक धावत्या रेल्वेचा त्यांना धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने इतर महिला या घटनेत थोडक्यात बचावल्या आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शानिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मृत अलका कोळी यांच्या पश्चात पती विजय कोळी, मुलगी जागृती आणि मुलगा कार्तिक असं कुटुंब आहे. आईच्या निधनाची बातमी मुलांना कळताच पतीसह मुलांनी मोठा आक्रोश केला. दोन मुलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. हे पाहून परिसरातील लोकांनाही अश्रू अनावर झाले. दोन मुलांवरुन आईचं छत्र हरपलं, अलका यांच्या अशा अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/H8iwbjy

No comments:

Post a Comment