Breaking

Monday, July 15, 2024

कोपा अमेरिका स्पर्धेची फायनल एक तास का उशिराने सुरु झाली, जाणून घ्या.. https://ift.tt/KBzt8Ec

मायामी (फ्लोरिडा) : कोपा अमेरिका फुबॉल स्पर्धेची फायनल. लिओनेल मेस्सीसारख्या जगविख्यात खेळाडूचे दर्शन आणि फुटबॉलचा अनपेक्षित थरार पाहण्यासाठी चाहते आसूसले होते. सर्वांनाच ही फायनल कधी सुरु होते, याची उत्सुकता होती. पण ही फायनल एक तास उशिराने सुरु झाली. पण तब्बल एक तास हा सामना सुरु का होत नव्हता, याचे कारण आता समोर आले आहे.तिकीट नसलेल्या चाहत्यांनी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी संघर्ष केला. त्यांची सुरक्षारक्षकांसह चकमक झाली. त्यामुळे हार्ड रॉक स्टेडियमवरील अर्जेंटिना आणि यांच्यातील अंतिम लढत सुमारे एक तास उशिरा सुरू झाली.दोन वर्षांनी होणाऱ्या वर्ल्ड कप लढती संयोजनासाठी निवड झालेल्या स्टेडियमवर तिकीट नसतानाही स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रामुख्याने कोलंबियाच्या चाहत्यांनी प्रयत्न केला. त्यांनी सुरक्षा कुंपणावरून उडी मारून स्टेडियममध्ये प्रवेश केला. त्यांना ताब्यात घेण्यासाठी सुरक्षारक्षकांची धावपळ उडाली. लढतीची वेळ सुरुवातीस ८ ऐवजी ८.३०, त्यानंतर ८.४५ करण्यात आली. अखेर ९.१५ वाजता लढत सुरू झाली.लढत सुरू होण्यापूर्वी बहुतेक तिकीट धारकांनी स्टेडियममध्ये प्रवेश केला होता. तिकीट नसलेल्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रवेशद्वारे बंद केले. चाहत्यांनी त्यामुळे स्वयंसेवकांना लक्ष्य केले. सामना सुरू होण्याची वेळ अर्ध्या तासाने लांबणीवर टाकण्यात आली; पण गोंधळ थांबला नाही. प्रतिस्पर्धी संघांना सुरक्षेसाठी स्टेडियममध्ये परत जाण्यास सांगण्यात आले. सामन्याच्या सुरक्षेसाठी ५५० पोलिसांसह खासगी सुरक्षा रक्षक होते. त्यातच काही चाहत्यांनी तिकीट असूनही प्रवेश न मिळाल्याची तक्रार केली आणि गोंधळ वाढला. त्यातच तिकीट धारक आणि तिकीट नसलेल्यांनी एकाच वेळी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. उकाड्यामुळे अनेकांना चक्कर आली. आपल्या कुटुंबीयांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळालेला नाही. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची तक्रार खेळाडूंनी केली. दरम्यान, दहा हजार डॉलर तिकिटांसाठी देऊनही प्रवेश मिळाला नाही. त्याच वेळी तिकीट नसलेल्या ५०० जणांनी घुसखोरी केली, असा आरोप काही चाहत्यांनी सोशल मीडियावरून केला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sv1ynC9

No comments:

Post a Comment