Breaking

Friday, July 5, 2024

Jalgaon News: दुर्दैवी! विवाहित तरुणाने अचानक घेतला टोकाचा निर्णय, कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश https://ift.tt/6p4Enxy

निलेश पाटील, जळगाव: जळगावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. २ जुलै रोजी शेतात विषारी औषध सेवन केल्याने उपचारादरम्यान तीस वर्षीय विवाहित तरुणाचा अखेर मृत्यू झाला आहे. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. जळगाव तालुक्यातील किनोद येथील ३० वर्षीय तरुणाने शेतात विषारी औषध घेतले होते. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाळ नारायण सपकाळे (३०) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल सपकाळे हा आई पत्नी दोन मुलांसह विनोद गावात वास्तव्याला होता. शेती आणि मजुरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान मंगळवारी २ जुलै रोजी त्याने दुपारी शेतात असताना विषारी औषध सेवन केले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती. नातेवाईकांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. याबाबत वैद्यकीय अधिकारी सुशांत निकुंभ यांनी दिलेल्या माहितीवरून जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याच्या पश्चात आई उर्मिला, पत्नी माधुरी, एक भाऊ, दोन मुलं आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. गोपाळ सोनवणे या विवाहित तरुणांनी टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या का केली हे मात्र कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. घरामध्ये दोन मुलं असताना आई पत्नी भाऊ असताना सर्व आनंदी वातावरण होते. मात्र अचानक शेतात जाऊन विषारी औषध सेवन केल्याने दोन दिवस शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळत असल्याने आज अखेर गोपाळ याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती परिवाराला कळताच रुग्णालयातच कुटुंबाने मोठा आक्रोश केला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Sz104CD

No comments:

Post a Comment