Breaking

Tuesday, July 23, 2024

Paris Olympic 2024: भारताला टेनिसमध्ये कोणाकडून असतील पदकांच्या आशा, जाणून घ्या... https://ift.tt/lu2aNIT

विनायक राणे : स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक वैयक्तिक पदक महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा जाधव यांनी कुस्तीत जिंकले होते. त्यानंतर भारतीय खेळाडूला ऑलिम्पिकमधील वैयक्तिक पदकासाठी४४ वर्षे प्रतिक्षा करावी लागली होती. १९९६च्या अॅटलांटा ऑलिम्पिकमध्ये टेनिसपटू लिअँडर पेसने एकेरीत ब्राँझपदक मिळवले होते. त्या ऑलिम्पिकमधील भारताचे ते एकमेव पदक होते. पॅरिसमध्ये भारताची भिस्त आणि एन. श्रीराम बालाजी या दुहेरीच्या जोडीवर आहे. ते टेनिसमधील २८ वर्षांचा भारताचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवतील, अशी अपेक्षा आहे.

...या खेळाडूंवर भिस्त

पॅरिस ऑलिम्पिकमधील टेनिसच्या पुरुष दुहेरीत अनुभवी रोहन बोपण्णा-एन. श्रीराम बालाजी, तर पुरुष एकेरीत सुमीत नागल कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धेचा ड्रॉ २५ जुलै रोजी जाहीर होणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये टेनिस...

- १८९६मध्ये अॅथेन्सला झालेल्या पहिल्या 'मॉडर्न ऑलिम्पियाड'मध्ये स्थान, त्यानंतर १९२४च्या ऑलिम्पिकपर्यंत सातत्याने स्पर्धा- १९२४नंतर आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस महासंघ आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांच्यात वादामुळे टेनिस ऑलिम्पिकबाहेर- १९६८च्या मेक्सिको आणि १९८४च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये टेनिसचा प्रदर्शनीय खेळ म्हणून समावेश- १९९८च्या सोल ऑलिम्पिकपासून टेनिसचे पुनरागमन, तेंव्हा व्यावसायिक टेनिसपटूंना स्थान देण्याचा निर्णय

खेळ आकड्यांचा...

१ - ऑलिम्पिक टेनिसमध्ये पदक मिळवणारा लिअँडर पेस एकमेव भारतीय. उपांत्य फेरीत सुवर्णविजेत्या आंद्रे अगासीविरुद्ध हार. ब्राँझपदकाच्या लढतीत पेसचा ब्राझीलच्या फर्नांडो मेलिगेनीविरुद्ध विजय.४ - ऑलिम्पिक टेनिसमध्ये सर्वाधिक सुवर्णपदकांचा विक्रम सेरेना आणि व्हिनस या विल्यम्स भगिंनींचा. त्यांची दुहेरीत एकमेंकीच्या साथीत तीन सुवर्ण, तर एकेरी प्रत्येकी एक२ - ऑलिम्पिक टेनिसच्या पुरुष एकेरीत ब्रिटनच्या अँडी मरेची दोन सुवर्णपदके. ही कामगिरी करणारा तो एकमेव टेनिसपटू.

टेनिस स्पर्धेविषयी

स्पर्धा कालावधी ः २७ जुलै ते ४ ऑगस्टएकूण पात्र खेळाडू ः १७२चुरस ः ५ सुवर्णपदकांसह १५ पदकांसाठीस्पर्धेचे स्वरुप ः पुरुष तसेच महिला एकेरीत ६४ खेळाडूंत चुरस तर दुहेरीत ३२ जोड्यांत. सर्व लढती तीन सेटच्यास्पर्धेसाठी ः रोलँ गॅरोवरील १२ कोर्ट. त्यातील सहा कोर्टवर सामने, तर सहा कोर्ट सरावासाठी

लक्षवेधक

- ऑलिम्पिक टेनिस स्पर्धा ३२ वर्षांनंतर क्ले कोर्टवर- १९९२च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमधील टेनिस स्पर्धा क्ले कोर्ट, त्यानंतर प्रथमच या प्रकारच्या कोर्टवर स्पर्धा- एकाच वर्षी चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा तसेच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्यास त्यास 'गोल्डन स्लॅम' संबोधले जाते- ही कामगिरी करणारी स्टेफी ग्राफ एकमेव टेनिसपटू. १९८८मध्ये ही सोनेरी कामगिरी


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/lR20yqm

No comments:

Post a Comment