नवी दिल्ली: 'नीट' परीक्षे संदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. नीट यूजीची फेरपरीक्षा होणार नाही असा निर्णय यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला. परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी योग्य नाही, यामुळे २४ लाख विद्यार्थ्यांवर परीणाम होईल असे कोर्टाने म्हटले. ही सुनावणी सुरू असताना न्यायालयात मोठा ड्रामा झाला. 'नीट'वर सुनावणी सुरू असताना अशी एक वेळ आली की सरन्यायाधीशांना चक्क सुरक्षारक्षकांना बोलवावे लागले. युक्तीवाद सुरू असताना त्यांचा मुद्दा सांगण्यासाठी उठले. तेव्हा सरन्यायाधिशांनी त्यांना याचिकाकर्त्यांचे वकील नरेंद्र हुड्डा यांचे बोलने झाल्यावर बोलण्यास सांगितले. यावर मॅथ्यूज गॅलरीमध्ये आले. त्यांच्या या वागणुकीवर सरन्यायाधीश नाराज झाले. तुम्ही असे उठून गॅलरीत येऊ शकत नाही. यावर उत्तर देत मॅथ्यूज म्हणाले, इथे मी सर्वात सिनिअर आहे. त्यावर सरन्यायाधीश पुन्हा नाराज होत म्हणाले, मी तुम्हाला वॉर्निंग देतोय. तुम्ही अशा प्रकारे गॅलरीत बोलू शकत नाही. मी या कोर्टचा इनचार्ज आहे. सुरक्षारक्षकांना बोलवा आणि यांना बाहेर करा, अशा शब्दात सरन्यायाधिश बोलले. सरन्यायाधिशांच्या या बोलण्यावर मॅथ्यूज यांनी उत्तर दिले की, मी स्वत:जातोय. त्यांना (सुरक्षारक्षकांना) काही सांगण्याची गरज नाही. यावर सरन्यायाधीश म्हणाले, तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. मी २४ वर्ष न्यायालय पाहिले आहे. कोर्टाच्या कामकाजात वकीलांना अशा प्रकारे वागण्याची परवानगी मी देऊ शकत नाही. यावर पुन्हा मॅथ्यूज यांनी बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मी १९७९ पासून पाहत आलोय. कोर्टात मॅथ्यूज ज्या पद्धतीने बोलत होते त्यावर सरन्यायाधिशांनी त्यांना वॉर्निंग दिली आणि म्हणाले, मला तुमच्या विरुद्ध नोटीस जारी करावी लागले. मॅथ्यूज यांच्या कोर्टातील वर्तनावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी देखील नाराजी व्यक्त केली. सुनावणी पुन्हा सुरू होण्याच्या आधी मॅथ्यूज यांनी सरन्यायाधिशांची माफी मागितली. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, मी माफ करतो. पण तुम्हाला अंदाज नाही की, तुम्ही मला किती कमीपणा दाखवला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sXuKWif
No comments:
Post a Comment