Breaking

Monday, July 22, 2024

मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी, पण विकेंडला रिक्षा चालवतो तरुण; कारण ऐकून थक्क व्हाल https://ift.tt/EWlCNXI

बेंगळुरू : बेंगळुरू हे शहर टेक्नोलॉजी, आयटी कंपन्यांसाठीचं हब मानलं जातं. याच बेंगळुरूमधील एका व्हायरल व्हिडिओने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. बेंगळुरूतील मायक्रोसॉफ्ट या आयटी कंपनीत काम करणारा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर चर्चेचा विषय बनला आहे. तो चर्चेत येण्यामागचं कारणही खास आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर असूनही तो शहरात ऑटोरिक्षा चालवतो. या तरुणाचा ऑटोरिक्षा चालवतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याची एकच चर्चा आहे. भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि आयटी हब असलेल्या बेंगळुरूमध्ये एक अनोखी गोष्ट समोर आली आहे. शहरात सॉफ्टवेअर इंजिनिअर चर्चेचा विषय बनला आहे. ३५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर कोरमंगला येथील मायक्रोसॉफ्ट या आयटी कंपनीत नोकरीला आहे. तो दर आठवड्यातील पाच दिवस ऑफिसला जातो, मात्र आठवड्याचे शेवटचे दोन दिवस तो नम्मा यात्री ही ऑटोरिक्षा चालवतो. इतक्या मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला असूनही तो रिक्षा का चालवतो असा प्रश्न अनेकांना पडला असेल, पण त्याच्या रिक्षा चालवण्यामागे वेगळंच कारण आहे. ३५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर आठवड्याच्या शेवटी त्याचा एकटेपणा घालवण्यासाठी रिक्षा चालवण्याचं काम करतो. पाच दिवस मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी केल्यानंतर तो शनिवार आणि रविवार या दोन सुट्ट्यांच्या दिवशी रिक्षा चालवतो. त्याचा एकटेपणा घालवण्यासाठी, त्याच्या एकटेपणाचा सामना करण्यासाठी तो हे रिक्षा चालवण्याचं काम करत असल्याचं समोर आलं आहे. २१ जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या तरुणाचा रिक्षा चालवतानाचा एक व्हिडिओ समोर आला. हा तरुण मायक्रोसॉफ्टची हुडी घालून रिक्षा चालवतो. त्याचा रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावरुन विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. काही नेटकऱ्यांनी त्याच्या एकाकीपणाबद्दल सहानुभूती व्यक्त केली, तर अनेकांनी इतक्या मोठ्या कंपनीत कामाला असतानाही, एका आयटी इंजिनिअरला अशाप्रकारे ऑटोरिक्षा चालवताना पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. मायक्रोसॉफ्टची हुडी घालून रिक्षा चालवणाऱ्या या तरुणाची सध्या एकच चर्चा आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/oR3Bflt

No comments:

Post a Comment