Breaking

Wednesday, August 14, 2024

विनेश फोगटच्या निकालावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले हा तर... https://ift.tt/1ACSpFz

संजय घारपुरे : विनेश फोगटला आता मिळू शकत नाही, असा निकाल क्रीडा लवादाने दिला आहे. या निर्णयावर आता भारतीय ऑलिम्पिक संघटनेटे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.विनेश फोगटला ऑलिम्पिक पदक नाकारण्याचा निर्णय धक्कादायक आहे. तिला अमानवी नियमांचा फटका बसला आहे. असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक होते, असे नमूद केले.क्रीडा लवादाच्या निर्णयाचा विनेश फोगटवर दूरगामी परिणाम होणार आहे. त्याचे क्रीडा क्षेत्रातही पडसाद उमटतील. विनेशला केवळ १०० ग्रॅमसाठी संधी नाकारण्यात आली. त्यांनी यामुळे खेळाडूला होणारा शारीरीक तसेच मानसिक त्रास लक्षातच घेतला नाही, असे उषा यांनी पत्रकात म्हंटले आहे. ऑलिम्पिक कुस्तीमधील ५० किलो गटाच्या निर्णायक लढतीसाठी अपात्र ठरवल्यानंतर २४ तासात विनेशने निवृत्ती जाहीर केली होती.शंभर ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे खेळाडूस अपात्र केल्याचे दूरगामी परिणाम होतील. त्याचबरोबर यामुळे नियमातील संदिग्धता आणि तसेच प्रत्येकजण आपल्याला हवा असलेला अर्थ लक्षात घेतो हेही लक्षात येते. वजनी गटाच्या स्पर्धेच्यावेळी दुसऱ्या दिवशी वजन जास्त असल्यामुळे स्पर्धकास बाद करण्याच्या नियमाचा फेरविचार आवश्यक आहे असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे स्पष्ट मत आहे. हा नियम अमानवी आहे. त्याचा खेळाडूंवर, विशेषतः महिला क्रीडापटूंवर विपरीत परिणाम होतो, असेही भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पत्रकात म्हंटले आहे.विनेशला मोठ्या प्रमाणावर सहानुभूती लाभली होती. मात्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख आणि जागतिक महासंघाचे अध्यक्ष नेनाद लालोविक यांनी नियमात कोणतीही सूट देणे चुकीचे असल्याचे सांगितले होते. विनेश फोगटच्या या निर्णयाने भारतामध्ये निराशेचे वातावरण असले तर ती आता पुन्हा एकदा रौप्यपदकासाठी अपील करू शकते, असे समोर येत आहे. विनेश फोगट आता स्वीस फेडरल ट्रिब्युनलकडे याचिका करू शकते आणि या क्रीडा लवादाच्या निर्णयाविरोधात दाद मागू शकते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/j90yHCA

No comments:

Post a Comment