Breaking

Wednesday, August 14, 2024

लाडक्या भावा,मी पाठीवर पडले... डोक्यावर नाही; योजनेचा पहिला हफ्ता बँकेत, राऊतांचे खोचक ट्वीट https://ift.tt/wr5kM3y

मुंबई : लाडक्या बहीण योजनेचे दोन्ही हफ्ते आज राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याच विषयावर यांनी ट्वीट करत महायुतीच्या लाडक्या बहीण योजनेवर टीका केली आहे. राज्य सरकारकडून १७ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र, १४ ऑगस्ट अर्थात, बुधवारपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार राम सातपुते यांनी ‘एक्स’द्वारे ही माहिती दिली. तसेच त्यांनी महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचे स्क्रीनशॉटही जोडले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यास दुजोरा दिला असून प्रत्यक्ष अंमलबजावणीपूर्वीची ही रंगीत तालीम असून, जमा झालेले हे पैसे परत घेण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावरच आता विरोधकांची टीका होवू लागली आहे. संजय राऊत ट्वीट करत म्हणाले, आजचा विनोद...... एक बाई ओढ्यावर कपडे धुवून परत येताना घसरून खाली पडली....मागे फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजीत पवार होते... त्यांनी बाईला उठायला मदत केली... बाईने त्यांना धन्यवाद दिले.... फडणवीस म्हणाले:माझ्या लाडक्या बहिणी,आम्हाला ओळखले का?मी फडणवीस, हे एकनाथ शिंदे आणि हे , आम्ही तुम्हाला उठायला मदत केली... २०२४ मधे आम्हालाच मत देणार ना??"बाई हसल्या आणि म्हणाल्या,"लाडक्या भावा,मी पाठीवर पडले... डोक्यावर नाही." अशी राऊतांनी टीका केली आहे. तर खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा लाडक्या बहीण योजनेला फसवी सांगितले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपयश आले. त्यामुळेच राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणली आहे. ही फसवी योजना निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, असे सुळे म्हणाल्या.

लाडक्या बहीणीसाठी सरकारची पुन्हा घोषणा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास आजपासून सुरुवात होत आहे. यातच आत्तापर्यंत ज्या लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अजूनही अर्ज केला नाही अशा लाभार्थ्यांसाठी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.अदिती तटकरे म्हणाल्या कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत हि अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. या योजनेचा लाभ ३१ ऑगस्ट नंतर पात्र लाभार्थ्यानाही मिळणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/XUFyg1N

No comments:

Post a Comment