म. टा. विशेष प्रतिनिधी : छत्रपतींचा पुतळा कोसळल्याची घटना खूप दु:खद आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील स्पष्टीकरण दिलेच आहे. हवेच्या जोराने ते झाले असून, हे असे का घडले याबाबत कंत्राटदारांना जे धारेवर धरायचे ते धरले जाईल. मात्र त्याहीपेक्षा पुन्हा एक पुतळा तिथे उभारायला पाहिजे ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि हीच मी विनंती करु शकते अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांनी बुधवारी दिली. शाळा तसेच कुटूंबांमध्ये स्त्रीयांचा आदर करायला शिकवणे फार गरजेचे असल्याचेही त्या म्हणाले.दिवीजा फाऊंडेशन, मुंबई महापालिका,मुंबई पोलिस आणि छात्र संसदच्या संयुक्त विद्यमाने बच्चे बोले मोरया ही मोहिम राबवण्यात येत असून इकोफ्रेंडली गणेशमुर्ती बनवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने वरळी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अमृता फडणवीस यांनी यावेळी महिला अत्याचाराच्या घटनांवरही प्रतिक्रिया दिली. स्त्री म्हणून मला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अत्याचाराची घटना घडली की त्याचा खूप त्रास होतो. मात्र यावर एकच असा उपाय नसून खूप सर्व उपाय मिळून एक उपाय बनतो. अशी घटना झाल्यानंतर त्वरित कारवाई आवश्यक आहे. तुम्हाला घरातच स्त्रीचा आदर करण्याचे शिकवले तर तुम्ही स्त्रीचा आदर करणार. पण काही माथेफिरु असतात की, ज्यांच्या घरात तसे शिकवले जात नाही. त्यांच्या कुटुंबात ते स्त्रियांवर अत्याचार होताना पाहतात आणि मग हेच लोक बाहेर जावून अत्याचार करतात. अशावेळी कुटुंब संस्था फारच महत्त्वाची आहे. शाळा, कुटुंबातून स्त्रियांचा आदर करण्याचे शिकवणे खूप गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.बच्चे बोले मोरया ही मोहीम सुरु झाल्याचा मला फार आनंद होत आहे. त्यात स्वत: लहान मुलांनी शाडू माती आणि इतर पद्धतीने इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवल्या आहेत. त्याचबरोबर एक मनोरंजन कार्यक्रम आम्ही केला. ही लहान मुले लोकांना समजवतील, आपल्याला संस्कृती पुढे न्यायची आहे, पण त्या करता आपल्याला आपली जबाबदारी देखील पार पाडायची आहे. त्याचा हा छोटोसा प्रयत्न आहे. इकोफ्रेंडली गणेशमूर्ती वापरायची असे आम्ही यानिमित्ताने आवाहन करतोय असेही त्यांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/QoImhD6
No comments:
Post a Comment