संजय घारपुरे : वाडा-मनोर या रस्त्यापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या कोहोज या प्रसिद्ध किल्ल्याच्या पायथ्याशी गोऱ्हे हे छोटेसे गाव आहे. याच आदिवासी गावातील साईनाथ मोहन पारधी याने १७ वर्षांखालील गटाच्या जागतिक स्पर्धेत ५१ किलो गटात ब्राँझपदक जिंकण्याचा पराक्रम केला. विभागात भारतीय कुस्तीगिरांना क्वचितच यश मिळते. त्यात साईनाथने प्रभावी यश मिळवले. त्याने कझाकस्तानच्या येरासी मुसान याचा ३-१ असा पराभव करून तिसरा क्रमांक मिळवला. खरे तर साईनाथ हा तुरान दाश्दामिरोव याच्याविरुद्ध पहिल्या फेरीत १-५ असा पराभूत झाला होता. मात्र, तुरानने अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे साईनाथला रिपेचेजद्वारे संधी मिळाली. साईनाथने रिपेचेजमध्ये अमेरिकेच्या डॉमेनिक मिचेल मुनार्तेओ याला ७-१ असे हरवले. त्या वेळी त्याने एकतर्फी वर्चस्व राखले होते. त्याची ब्राँझपदकासाठी लढत उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या येरासीविरुद्ध झाली. त्यात साईनाथने बाजी मारली.साईनाथचे यश हे स्वप्नवतच आहे. त्याने सुरुवातीस भाईंदर येथील गणेश आखाडा कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेतले होते. त्याच वेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी महाराष्ट्रातील कुस्तीगिरांनी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवावे, या उद्देशातून 'मिशन ऑलिंपिक' ही योजना सुरू केली. या योजनेतील कुस्तीगिरांची निवड करण्यासाठी २०२१च्या जानेवारीत पुण्यातील जाणता राजा कुस्ती केंद्रावर राज्यातील १५ वर्षांखालील कुस्तीगिरांसाठी निवड चाचणी घेण्यात आली होती. त्यात १६६ कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता. त्यातून १० कुस्तीगिरांची निवड झाली. निवडलेल्या कुस्तीगिरांचा सर्व खर्च भोंडवे अध्यक्ष असलेली 'ड्रीम फाउंडेशन जाणता राजा कुस्ती केंद्र' करत आहे. निवड चाचणीतून साईनाथची ४२ किलो फ्रीस्टाईल विभागात निवड झाली होती. मात्र, त्याचा सुमारे एका वर्षाचा सराव पाहून त्यास ग्रिको रोमनमध्ये खेळवण्याचा निर्णय झाला. तेव्हापासून त्याचा ग्रिको रोमनचा सराव सुरू झाला. जाणता राजा कुस्ती केंद्रात येण्यापूर्वी तो कोणतीही स्पर्धा खेळले नव्हता. मात्र, त्याने पदार्पणाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ब्राँझपदक जिंकून जोरदार सुरुवात केली. त्यामुळे आता साईनाथकडून भविष्यातील आशा वाढलेल्या असतील.
साईनाथचे यश
- २०२२च्या राष्ट्रीय १५ वर्षांखालील फेडरेशन कपमध्ये तिसरा- २०२२च्याच राष्ट्रीय ग्रँड प्रिक्स स्पर्धेत तिसरा- २०२४च्या राष्ट्रीय १५ वर्षांखालील कॅडेट स्पर्धेत विजेता- २०२४च्या राष्ट्रीय १७ वर्षांखालील कॅडेट स्पर्धेत तिसरा- २०२४च्या आशियाई १७ वर्षांखालील स्पर्धेसाठी निवडfrom Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/NpPQ0Ry
No comments:
Post a Comment