(संतोष शिराळे) : माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावच्या नराधम बापाने आपल्याच केल्याची घटना समोर आली आहे. श्रावणी सोमवारनिमित्त हे कुटुंब शिखर शिंगणापूरला महादेवाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी आपल्याच मुलीवर दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कारासारखा अतिप्रसंग केल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे. या प्रकरणी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नराधम बापाला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम बाप शिंगणापूर - मार्डी रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्याच्या बहाण्याने मुलीस घेऊन गेला. सोबत आणलेल्या पत्नीस व दोन मुलांना त्याने आईस्क्रीम खायला देऊन शिखर शिंगणापूरमध्येच थांबवले. यावेळी पेट्रोल टाकण्यासाठी गेलेला नराधम बाप पेट्रोल पंपावर गेलाच नाही. शिंगणापूर - मार्डी रस्त्यावर असलेल्या मक्याच्या शेतात आपल्या दहा वर्षाच्या मुलीला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असतानाच मुलगी ओरडल्याने आसपासच्या लोकांनी त्याला मुलीपासून वेगळे केले. नराधम बापाविरोधात मुलीच्या आईने दहिवडी पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे यांनी तात्काळ आरोपीस अटक करून न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. मंगळवारी राज्य लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने हादरून गेले. बदलापूर येथे एका शाळेत दोन लहान मुलांवर झालेल्या घटनेचे संतप्त पडसाद उमटले. यामुळे नागरिकांनी जवळ जवळ १० तास रेल्वे मार्ग बंद केला होता. अशाच प्रकारची घटना पुण्यातून देखील समोर आली. ज्यात एका शाळेतील मुलीवर त्याच शाळेत शिकणाऱ्या १९ वर्षीय मुलीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलास अटक केली. तर अकोल्यातील बाळापूर तालुक्यात एका शिक्षकाने अश्लिल व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा छळ केल्याची घटना समोर आली. धक्कादायक म्हणजे हा प्रकार गेल्या ४ महिन्यांपासून सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद सरदार नावाच्या शिक्षकाला अटक केली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/ek4vDpF
No comments:
Post a Comment