Breaking

Monday, August 12, 2024

भारताने चौथ्या क्रमांकावर राहिल्यामुळे किती पदकं गमावली, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय घडलं जाणून घ्या... https://ift.tt/C5HKXAg

पॅरिस : भारताला आता सहाच पदकं मिळाली, अशी चर्चा सुरु आहे. पण भारताने चौथ्या क्रमांकावर राहील्यामुळे किती पदकं गमावली, हे आता समोर आले आहे. चौथ्या क्रमांकामुळे भारताला किती पदकांनी हुलकावणी दिली, हे ऐकल्यावर बऱ्याच जणांना धक्का बसू शकतो.

मनू भाकर

ने भारतासाठी दोन कांस्यपदकं जिंकली. पण मनूला यावेळी भारतासाठी तिसरे पदक जिंकण्याचीही संधी होती. २५ मीटर एअर पिस्तुल विभागात तिच्याकडून पदकाच्या आशा होत्या. पण मनू यावेळी चौथ्या क्रमांकावर राहीली आणि भारताचे अजून एक पदक हुकले.

मीराबाई चानू

ने टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताला रौप्यपदक जिंकवून दिले होते. त्यामुळे या ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून सुवर्णपदकाची आशा होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मीराबाई दुसऱ्या स्थानावर होती. पण अखेरच्या फेरीत ती चौथ्या क्रमांकावर घसरली. यावेळी फक्त एका गुणामुळे मीराबाईचे पदक हुकले.

लक्ष्य सेन

भारताया युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भन्नाट फॉर्मात होता. त्यामुळे तो अंतिम फेरीत पोहोचून पदक निश्चित करेल, असे वाटत होते. पण लक्ष्य सेनला पुरुषांच्या एकेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि त्यामुळे भारताचे अजून एक पदक हुकले.

अर्जुन बबुता

भारताचा अर्जुन बबुता १० मीटर एअर रायफल प्रकारात दमदार कामगिरी करत होता. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या आशा होत्या. पण अर्जुन यावेळी चौथ्या क्रमांकावर आला आणि भारताला चौथ्या पदकाने हुलकावणी दिली.

अंकिता भकट आणि धीरज

तिरंदाजीच्या मिश्र दुहेरी गटात अंकिता भकट आणि धरज हे अंतिम फेरीत पोहोचतील, असे वाटत होते. पण त्यांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीतही ते पराभूत झाले आणि भारताचे पाचवे पदक हुकले.

माहेश्वरी चौहान आणि अनंत नारुका

भारताचे नेमबाज माहेश्वरी चौहान आणि अनंत नारुका यांच्याकडून देशाला मोठ्या आशा होत्या. नेमबाजीतील स्कीट प्रकारात ते पटकावण्याच्या तयारीत होते. पण यावेळी चीनने फक्त एका गुणाने त्यांना पिछाडीवर टाकले. त्यामुळे भारताचे अजून एक पदक हुकले. भारताने जर ही सर्व पदकं जिंकली असती तर त्यांच्या खात्यात आता ११ कांस्यपदकं असली असती आणि एका रौप्यपदकासह भारताने एक डझन पदके मायदेशी आणली असती. पण यावेळी भारताच्या या सहा खेळाडूंचे दुर्देव म्हणावे लागेल. कारण भारताची ही पदकं फक्त काही फरकानेच हुकली. काही वेळा तर फक्त एका गुणाच्या फरकाने भारताने पदकं गमवावी लागली आहेत. त्यामुळे आता पुढच्या ऑलिम्पिकमध्ये भारत किती पदकं जिंकतो, हे सर्वात महत्वाचे ठरणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/8xbwW30

No comments:

Post a Comment