Breaking

Tuesday, August 13, 2024

तेरा भाई अब ट्रेन चलाएगा! मोटारमॅनच्या डब्यात रीलस्टारचा धिंगाणा, पोलीसांनी दाखवला खाकी हिसका https://ift.tt/MamCDbK

कसारा, प्रदिप भणगे : मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकात चार नंबर फलाटावर उभ्या असलेल्या लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून रील शूट करून त्याचा व्हिडिओ, इंस्टाग्राम , फेसबुक , व्हॉट्स एपग्रुपवर व्हायरल करणाऱ्या दोन रीलस्टारला रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी नाशिकमधून अटक केली आहे. राजा हिम्मत येरवाल (२०), रितेश हिरालाल जाधव (१८) अशी अटक रीलस्टार आरोपींची नावे आहेत. ते दोघेही नाशिक येथील रहिवासी आहेत.रेल्वे सुरक्षा बळातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दहा दिवसापूर्वी कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर उभ्या असलेल्या कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये बेकायदा घुसून आरोपी राजा आणि रितेश यांनी मोबाईल कॅमेऱ्यात एक रील तयार करण्यासाटी व्हिडिओ शूट केला होता. या रिलच्या व्हिडीओमध्ये ते मोटरमन असल्यासारखे आणि तेथील यंत्रणेची हाताळणी करत होते. शिवाय सुरू करण्याचा फाजील अभिनय करत असून मित्रांना मागील डब्ब्यात मध्ये बसण्याचे सांगत आहे. तसेच तुम्हारा भाई अब ट्रेन चलाएगा असे बोलून दुसरा आरोपी म्हणतो तुझे बाईक चलाना नही आता तू क्या लोकल चलाएगा! असे बोलणाऱ्या मित्राच्या गालात चापट मारतानाचा व्हिडिओ या दोन रीलस्टारने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. हाच व्हायरल व्हिडिओ रेल्वे सुरक्षा बाळाच्या पथकाला मोबाईलमध्ये दिसताच त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत कसारा वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा आरपीएफचे निरीक्षक एम. के, सौनी यांनी लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून हाच व्हिडीओ तयार करण्यात आल्याने रेल्वेच्या सायबर सुरक्षा विभागाने समाज माध्यमांतील या व्हायरल व्हिडिओच्या अनुषंगाने आरोपींचा तपास सुरू केला होता. कसारा रेल्वे स्थानकांमधील सीसीटीव्ही चित्रण, इतर तांत्रिक माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी या दोन्ही तरूणांची ओळख पटवली. ते नाशिक येथील रहिवासी असल्याचे समजले. रेल्वे सुरक्षा बळ आणि स्थानिक पोलिसांनी नाशिकमध्ये या तरूणांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली. हे दोन्ही तरूण नाशिकमधून अटक केले. या तरूणांनी कसारा रेल्वे स्थानकातील कसारा लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये घुसून बेकायदा चित्रफित तयार केल्याची कबुली रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना दिली. पोलिसांनी त्यांच्या दोषारोप ठेऊन त्यांना ८ ऑगस्ट रोजी अटक केली. असाच प्रकार यापूर्वी गुलजार शेख याने करून रेल्वे रुळाशी छेडछाड केली होती. त्यालाही अटक करण्यात आली आहे.रेल्वेच्या आवारात, लोकलमध्ये कोणीही गैरकृत्य करत असेल तर त्याने १३९ किंवा ९००४४१०७३५ वर संपर्क साधण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा जवानांनी केले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/K5uWLvy

No comments:

Post a Comment