नवी दिल्ली: भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जलद गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ३१ वर्षीय क्रिकेटपटू बरिंदर सरांने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोबत देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले. सरांने जानेवारी २०१६ ते जून २०१६ या काळात भारताकडून ६ वनडे आणि २ टी-२० मॅच खेळल्या होत्या. त्यानंतर तो संघाबाहेर झाला आणि पुन्हा त्याला संधी मिळाली नाही. सरांला आयपीएलमध्ये देखील संधी मिळाली नाही. इंस्टाग्रामवर लिहलेल्या पोस्टमध्ये म्हणतो, आता मी अधिकृतपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. २००९ साली क्रिकेटमध्ये आल्यानंतर मी अनेक चांगले अनुभव घेतले. जलद गोलंदाजी माझ्यासाठी महत्त्वाची ठरली. आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळाले. माझे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील करिअर छोटे असले तरी तेथील आठवणी नेहमी लक्षात राहतील. मी नेहमी देवाचे आभारी असेन. एका शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या बरिंदर सरांने किंग्ज इलेव्हन पंजाबची जाहिरात पाहून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. या जाहिरातीत युवा खेळाडूंना ट्रायलसाठी बोलवले होते. त्याआधी बरिंदर हरियाणाच्या भिवानी बॉक्सिंग क्लबमध्ये एक बॉक्सर म्हणून प्रशिक्षण घेत होता. त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. नंतर २०१५ साली आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला संधी दिली. पुढील एका वर्षात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय वनडे संघात त्याची निवड करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे फक्त ८ ए लिस्ट मॅचचा अनुभव होता. १२ जानेवारी रोजी पर्थ येथे धोनीच्या नेतृत्वाखाली त्याने वनडेत पदार्पण केले. पहिल्या वनडेत त्याने ५६ धावा देत ३ विकेट घेतल्या होत्या.बरिंदर सरांला जून २०१६ साली झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडण्यात आले. हरारे येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने पदार्पण केले. पहिल्या टी-२० सामन्यात त्याने १० धावा देत ४ विकेट घेतल्या. भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या लढतीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सरांने २०११ ते २०१ या काळात १८ प्रथम श्रेणी, ३१ लिस्ट ए आणि ४८ टी-२० सामने खेळले. आयपीएलमध्ये त्याने राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याने २०१५ ते २०१९ या काळात आयपीएलमधील २४ सामन्यात १८ विकेट घेतल्या. बरिंदरने २०२०-२१ साली विजय हजारे ट्रॉफीत पंजाबकडून अखेरची मॅच खेळली होती. त्याच्या नावावर १८ प्रथम श्रेणी लढतीत ४७ विकेट, ३१ लिस्ट ए सामन्यात ४५ विकेट तर ४८ टी-२० सामन्यात ४५ विकेट आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/zdt1MRW
No comments:
Post a Comment