मुंबई: झी मराठीवर लवकरच नवी मालिका सुरू होणार असून '' असे या मालिकेचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी आषाढी एकादशीच्या निमित्ताने या मालिकेची घोषणा करण्यात आली होती. आता या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरही हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. झी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमो व्हिडिओला असे कॅप्शन देण्यात आले आहे की, 'तिच्या आवाजाची गोडी प्रत्येकाला लागली, रुपानं ती सावळ्याची जणू सावली...' या प्रोमोमध्ये दिसते आहे की या मालिकेतील नायिकेच्या आवाजाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले आहेत. तिला गावातील लोक 'पांडुरंगाची सावली' असे म्हणून संबोधतात, शिवाय तिचा आवाज खूप गोड असल्याचेही म्हणतात. एक काका म्हणतात की, 'जेवढा गोड आवाज आहे, तेवढीच दिसायला गोड असती तर...' प्रोमोमध्ये नायिका 'माझे माहेर पंढरी' हे भावगीत गात आहे. त्यानंतर विठ्ठलाच्या पायावर जलाभिषेक घालून फूलंही वाहते. यावेळी अभिनेत्रीचा चेहरा दाखवण्यात आला आहे. ही भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर साकारणार आहे. प्राप्ती याआधी कलर्स मराठी वाहिनीवर 'काव्यांजली' या मालिकेत दिसली होती. अभिनेत्रीला या नव्या मालिकेत पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे, शिवाय नव्या प्रोजेक्टसाठी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र झी मराठी वाहिनीला या प्रोमोनंतर ट्रोल करण्यात आले आहे.
काय आहे ट्रोलिंगचे कारण?
या मालिकेतील नायिका सावळी दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांनी असा सवाल केला आहे की, गोऱ्या अभिनेत्रीला मेकअप करुन सावळं का दाखवलं आहे? अनेकांनी याची तुलना 'रंग माझा वेगळा'मधील रेश्मा शिंदेच्या भूमिकेशी केली आहे. एका युजरने लिहिले की, 'हे गोऱ्यांना काळं करुन का दाखवतात?' अन्य एक कमेंट आहे की, 'मराठीमध्ये अनेक सावळ्या रंगाच्या अभिनेत्री आहेत, तरी गोऱ्या अभिनेत्री का?' काही युजरनी सल्ला दिला की, 'तुम्ही एखाद्या सावळ्या रंगाच्या मुलीला कास्ट करू शकले असता.' एका युजरने लांबलचक कमेंट करत म्हटले की, 'गोऱ्या मुलीला सावळं दाखवायची काय गरज आहे? रिअलमध्ये एखादी सावळी मुलगी घेतली असती तर अजून चांगले वाटले असते. सावळ्या मुली पण बघायला सुंदर असतात, पण टीव्हीवाल्यांना गोऱ्याच हव्या, त्यापेक्षा बंद करा असल्या सीरियल.' अन्य एक कमेंट आहे की, 'सावळ्या रंगाच्या एखाद्या मुलीला हे संधी का देत नाही? जी अभिनेत्री सावळी नाही, तिला मेकअप करुन काय उपयोग? तुम्हाला सौंदर्याची व्याख्या बदलायची आहे का?' दरम्यान मेकर्सना ट्रोल करत असले तरी प्राप्तीचे चाहते मात्र तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तिच्या नव्या मालिकेसाठी कौतुकाच्या कमेंटही आल्या आहेत.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/HYJ8Pdn
No comments:
Post a Comment