Breaking

Saturday, August 10, 2024

केशवराव भोसले नाट्यगृह युद्ध पातळीवर पुन्हा उभारण्यात येणार; मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरकांना ग्वाही, सरकारकडून २० कोटींची मदत जाहीर https://ift.tt/gIaPkCF

कोल्हापूर (नयन यादवाड): राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर भक्कमपणे उभारलं होतं. हे नाट्यगृह कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं. या भावनांचा विचार करून हे नाट्यगृह लवकरात लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटींची आर्थिक देणार, अशी घोषणा केली आहे.गुरुवारी 8 ऑगस्ट रोजी रात्री कोल्हापूरच्या कलाकारांचं माहेरघर असलेलं आणि ज्या व्यासपीठावर येऊन अनेक महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी यांनी गदा उचलले ते खासबागच्या मैदानातील मुख्य व्यासपीठ आगीत जळून खाक झाल. डोळ्यासमोर हे दोन वास्तू जळत असताना पाहून अनेक कलाकार अनेक कोल्हापूरकरांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. यानंतर ही वस्तू पुन्हा उभे करण्यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी होऊ लागली. दरम्यान आज अचानक संध्याकाळच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात दाखल होत या नाट्यगृहाची आणि खासबाग मैदानातील व्यासपीठाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक कलाकार उपस्थित होते. यावेळी अनेक कलाकारांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडत हे नाट्यगृह पुन्हा लवकरात लवकर उभे करण्याची मागणी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाट्यगृह युध्दपातळीवर कोल्हापुरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने तयार केलेल्या आराखड्यानुसार २५ कोटी रूपयांची गरज आहे. नाट्यगृहाचा विमा ५ कोटींचा होता. उर्वरीत रक्कम शासनाकडून दिली जाईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. नुकसानग्रस्त झालेल्या नाट्यगृहासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार तसेच नाट्यगृहे अनेक असतात पण काही नाट्यगृहांशी कलावंत आणि श्रोत्यांचं जिव्हाळ्याचं नातं असतं. जशा कोल्हापूर वासियांच्या या नाट्यगृहाशी भावना जोडल्या आहेत त्याप्रमाणे आमच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत. अनेक कलावंताची मागणी आहे की, हे नाट्यगृह जसं पूर्वी होतं तसंच पुन्हा उभं राहावं. मदतीसाठी मला खूप फोन आले, खूप मेसेजेस आले. शासन हे सर्वसामान्यांना न्याय देणारं असून कलावंत आणि श्रोत्यांचादेखील आदर करणारं शासन आहे. स्थानिक कलाकाराशी संवाद साधल्यानंतर नाट्यगृहाशी भावनिक नातं किती घट्ट होतं याची एक जाणीव होते. नुकसानग्रस्त झालेल्या नाट्यगृहासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच याबाबत फॉरेन्सिंक विभाग व पोलीस विभाग या घटनेची चौकशीही करीत आहेत. परंतु हे नाट्यगृह उभे पुन्हा राहणं हे महत्त्वाचं आहे. चौकशी होईल आणि जे दोषी असतील त्याच्यावर पुढे कारवाईही होईल, असेही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/pEc5I6H

No comments:

Post a Comment