Breaking

Sunday, August 11, 2024

झोपेत हल्ला, वाचण्यासाठी तिची धडपड पण प्रयत्न अयशस्वी; एका हेडफोनवरुन नराधम ताब्यात, रिपोर्टमध्ये धक्कादायक समोर https://ift.tt/PKuBVMR

कोलकाता : कोलकातामध्ये शुक्रवारी ट्रेनी, निवासी डॉक्टरची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आणि संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पाठवण्यात आला होता. हा अहवाल समोर आल्यानंतर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या झाल्याचं सांगितलं. त्याशिवाय आणखी एका अंतिम शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पहिल्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. निवासी डॉक्टर तरुणीने आपला जीव वाचवण्यासाठी धडपड केली मात्र ती यातून वाचू शकली नाही. आरोपीने क्रूरतेची मर्यादा ओलांडत तिच्यावर अत्याचार नंतर हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी पहिल्या अहवालानंतर दिलेल्या माहितीनुसार, तरुणीच्या दोन्ही डोळ्यातून, तोंडावरुन रक्त वाहत होतं. तिच्या चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या. तरुणीच्या गुप्तांगातून रक्त वाहत होतं. तिच्या संपूर्ण शरीरावर पोट, मान, हात, ओठांवरही जखमा होत्या.

काय नेमकं घडलं?

शुक्रवारी कोलकातामधील आरजी कर सरकारी रुग्णालयाच्या सेमीनार हॉलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता. छाती रोग विभागाची द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी, निवासी डॉक्टरची नाइट शिफ्ट होती. त्यामुळे ती रुग्णालयातील सेमीनार हॉलमध्ये एकटीच आराम करण्यासाठी गेली होती. त्याचवेळी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने तिला गाठलं. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तिची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

एका हेडफोनमुळे आरोपी समोर

तरुणीच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यातील फुजेटच्या आधारे काही संशयित व्यक्तींची यादी तयार केली. पोलिसांना घटनास्थळी एक ब्लूटूथ हेडफोन आढळला. ज्यावेळी हत्या झाली त्यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉय हा सेमीनार हॉलजवळ फिरताना दिसत होता. त्यानंतर शुक्रवारी रुग्णालयातून तो बाहेर पडतानाही सीसीटीव्हीमध्ये दिसला. सर्व संशयितांना चौकशीसाठी बोलण्यात आलं. पोलिसांनी तपासाआधी संशयितांचे फोन जप्त केले. पोलिसांना घटनास्थळी आढळलेला हेडफोन सर्व संशयितांच्या फोनशी कनेक्ट करुन पाहिला जात होता. त्यावेळी संजय रॉयचा फोन घटनास्थळी मिळालेल्या हेडफोनशी लगेच कनेक्ट झाला. यावरुन पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं. पोलिसांच्या सक्त चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. अधिक तपासासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले होते. तरुणीवर अत्याचार, तिची हत्या केल्यानंतर आरोपी त्याच्या घरी गेला. त्याने त्याचे कपडेही धुतले. मात्र तपासावेळी पोलीस त्याच्या घरी पोहोचले असता, त्याच्या बुटावर रक्ताचे डागही आढळले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/89i2mKG

No comments:

Post a Comment