Breaking

Sunday, August 11, 2024

Neeraj Chopra: तीन मजल्यांचा आलिशान बंगला ते महागड्या गाड्या, चोप्रा हाऊसचा व्हिडिओ पाहाल तर हैराण व्हाल... https://ift.tt/kM8lDRp

नवी दिल्ली : भारताला सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदकं भाला फेक प्रकारात जिंकून देणारा नीरज चोप्रा हा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यानंतर नीरज चोप्राच्या आलिशान बंगल्याचा व्हिडिओ व्हाययरल झाला आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहाल तर तुम्हीही हैराण व्हाल.नीरजचा तीन मजल्यांचा मोठा बंगला जो आहे तो पानीपत येथे आहे. या बंगल्याचा गेट पाहून बरेच जण थक्क होतात. या बंगलाच्या बाहेर एक भला मोठा गेट आहे, तो पाहून या महालाचा अंदाज येऊ शकतो. या बंगल्याबाहेर मोठ्या अक्षरांमध्ये Chopra's असे लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर यावेळी नीरज हा मोठ्या कार्स आणि बाइक्सचा शौकिन असल्याचे पाहायला मिळत आहे.जेव्हा या बंगल्याच्या आतमध्ये आपण पोहोचतो तेव्हा नीरजच्या गाड्यांचा ताफा दिसतो. नीरजकडे रेंज रोव्हरसारखी महागडी गाडी आहे, जिची किंमत जवळपास तीन कोटी रुपये आहे. यामझ्ये फोर्डची मस्टेंगसारखी जबरदस्त गाडीही आहे. या गाडीची किंमत जवळपास एक कोटी रुपये आहे. नीरजने आनंद महिंद्रा यांनी खास एसयुव्ही गाडीही दिली होती. ती नीरजच्या ताफ्यात आहे. त्याचबरोबर नीरजकडे फोर्च्युवर गाडीही आहे.नीरज हा कार्सबरोबर बाईक्सचाही शौकिन आहे. नीरजकडे हार्ले डेव्हिडसन १२, ००० रोडस्टर ही महागडी बाईक आली. या बाईकची किंमत जवळपास १२ लाख रुपये असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर नीरजकडे बजाजच पल्सर २२० एफ ही बाईक आहे, जिची किंमत जवळपास १.५ लाख रुपये असल्याचे म्हटले जात आहे. नीरजकडे हिरव्या रंगाचा एक ट्रॅक्टरही पाहायला मळत आहे.नीरजचे नेट वर्थ हे जवळपास ३७ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. नीरजच्या बंगल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये नीरजचा बंगला किती आलिशाल असून शकतो, याचा अंदाच येऊ शकतो. नीरजचा हा बंगला पानीपत येथे आहे. त्याचबरोबर भारत सरकारकडून त्याच्यावर करोडो रुपयांचा खर्च केला जात आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/ceDZ5sK

No comments:

Post a Comment