Breaking

Saturday, August 3, 2024

भारताच्या मेडलचा रंग बदलणार... लक्ष्य सेनचा सामना कधी आणि किती वाजता होणार जाणून घ्या... https://ift.tt/u7cel4z

पॅरिस : भारताने आतापर्यंत पॅरिस ऑलिम्मपिकमध्ये तीन पदके पटकावली आहेत, पण ही तिन्ही कांस्यपदके आहे. त्यामुळे भारताच्या मेडलचा रंग कधी बदलणार, अशी चर्चा जगभरात सुरु आहे. पण आता भारताच्या मेडलचा रंग बदलण्याची आशा सर्वांनाच आहे. कारण भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन रविवारी कोर्टमध्ये उतरेल, तो भारताच्या मेडलचा रंग बदलण्यासाठीच. लक्ष्य सेनचा उपांत्य फेरीतीचा सामना कधी आणि किती वाजता होणार आहे, याची माहिती आता समोर आली आहे.

लक्ष्य सेनचा सामना कोणाबरोबर होणार आहे...

भारताचा लक्ष्य सेन हा रविवारी उपांत्य फेरीचा सामना खेळायला उतरणार आहे. लक्ष्यचा हा सामना विक्टर अॅक्सेलसनशी होणार आहे. लक्ष्यने हा सामना जिंकला तर तो थेट अंतिम फेरीत पोहोचणार आहे. लक्ष्य सेन अंतिम फेरीत पोहोचला तर त्याला सुवर्ण किंवा रौप्यपदक जिंकता येऊ शकतं. त्यामुळे लक्ष्य सेनचा हा सामना महत्वाचा असणार आहे.

लक्ष्य सेनचा सामना कधी आणि किती वाजता होणार आहे...

लक्ष्य सेनवर सर्व भारतीयांच्या नजरा लागलेल्या असतील आणि त्याचा हा उपांत्य फेरीतील सामना हा रविवारी ४ ऑगस्टला होणार आहे. लक्ष्य सेनला हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे सुपर संडेचा हा सामना पाहण्यासाठी सर्वांची नजर लक्ष्य सेनवर असेल.

लक्ष्य सेनचा सामना हा लाइव्ह कुठे पाहू शकता...

लक्ष्य सेनच्या या सामन्याचा एकही क्षण भारतीय चुकवणार नाहीत. लक्ष्य सेनचा हा सामना स्पोर्ट्स १८ या वाहिनीवर होणार आहे, तर जिओ सिनेमावरही हा सामना लाइव्ह पाहता येऊ शकतो.

लक्ष्य सेनची दमदार कामगिरी....

लक्ष्य सेनने तर भारताच्या एच. एस. प्रणॉयला पराभूत करत सर्वांना धक्का दिला होता. त्यानंतर सेनची उपांत्यपूर्व लढतीत तैवानच्या चू तिएन चेनशी गाठ पडली. लक्ष्य सेन या सामन्यात पिछाडीवर होता. पण लक्ष्य सेनने पहिला गेम गमावला असला तरी त्यानंतर दोन्ही गेम जिंकले आणि उपांत्य फेरीत दिमाखात एंट्री केली. आता लक्ष्य सेनने हा सामना जिंकला तर त्याला सुवर्ण किंवा रौप्यपदक जिंकता येई शकते.

भारतीय बॅडमिंटपटूंची ऑलिम्पिकमधील आतापर्यंतची कामगिरी...

ऑलिम्पिकमधील स्पर्धेच्या पुरुष एकेरीतून उपांत्य फेरी गाठणारा लक्ष्य सेन पहिलाच भारतीय ठरला आहे. ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठणारा लक्ष्य तिसराच भारतीय बॅडमिंटनपटू ठरला. यापूर्वी, पी. व्ही. सिंधू आणि साईना नेहवाल यांनी अशी कामगिरी केली होती. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये साईनाने ब्राँझपदक मिळवले होते, तर सिंधूने २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य आणि २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदक मिळवले होते. लक्ष्य सेनने भारतीयांच्या मनात सुवर्णपदकाची आशा निर्माण केली आहे. तो आता भारताला जिंकवून देणार की नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/YUxm6ak

No comments:

Post a Comment