भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेनने उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्यने चायनीज तैपेईच्या खेळाडूचा पराभव केला. तीन गेम रंगलेल्या या सामन्यात लक्ष्यने चायनीज तैपेईचा खेळाडू चाऊ तिएन चेनचा पराभव करत पदकाच्या दिशेने पाऊल टाकले. विजयाची नोंद करून लक्ष्य आपले पदक निश्चित करेल. लक्ष्यने प्रतिस्पर्ध्याला १९-२१, २१-१५ आणि २१-१२ असे पराभूत केले. लक्ष्य सेनने भारतीय बॅडमिंटनमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपेईच्या चू टिन चेनविरुद्ध तीन गेमच्या रोमहर्षक विजयासह, सेनने अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे यापूर्वी कोणताही भारतीय पुरुष शटलर पोहोचला नव्हता.पहिल्या सेटच्या सुरुवातीला लक्ष्य सेन आणि चीनच्या चू तिएन चेन यांच्यात निकराची लढत झाली. एका वेळी दोन्ही खेळाडू बरोबरीवर होते आणि स्कोअर ९-९ असा होता. यानंतर चू तिएन चेनने आघाडी घेण्यास सुरुवात केली. सेनला पुनरागमनाची फारशी संधी दिली नाही. मात्र, आघाडी घेतल्यानंतर चू तिएन चेनने काही चुका केल्या. ज्यामुळे सेनने स्कोअर १५-१५ पर्यंत नेला. लक्ष्य सेनने आपल्या ताकदीचा पुरेपूर वापर करून पुढाकार घ्यायला सुरुवात केली. एकेकाळी सेन १७-१५ ने आघाडीवर होता. येथून दोघांमध्ये निकराची लढत पाहायला मिळाली. गुणसंख्या १८-१८ अशी झाली. यानंतर चू तिएन चेनने आघाडी घेत पहिला गेम २१-१९ असा जिंकला. लक्ष्य सेनने दुसऱ्या सेटची सुरुवात आघाडीसह केली. मात्र, चू तिएन चेनला परतायला जास्त वेळ लागला नाही. यानंतर दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. गेम ५-५ असा बरोबरीत आला. यानंतर दोन्ही खेळाडू थोड्या फरकाने पुढे राहिले. काही वेळातच स्कोअर १०-१० पर्यंत पोहोचला. लक्ष्य सेन आणि चू तिएन चेन यांच्यातील चुरशीची लढत कायम राहिली. कधी सेनने पुढाकार घेतला तर कधी चू पुढे. हळूहळू सेनने वर्चस्व राखण्यास सुरुवात केलीय स्कोअर १८-१४ पर्यंत पोहोचला. यादरम्यान चू तिएन चेननेही काही चुका केल्या. लक्ष्यने याचा पुरेपूर फायदा घेत दुसरा गेम २१-१५ असा जिंकला.तिसऱ्या सेटच्या सुरुवातीपासूनच दोन्ही खेळाडूंनी जोरदार आक्रमण करण्यास सुरुवात केली. मात्र, जसजसा सामना पुढे सरकत गेला, तसतशी सेनची पकड मजबूत होत गेली. चू तिएन चेनने तिसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लक्ष्य सेनने त्याचे मनसुबे उधळले आणि हा गेम २१-१२ असा जिंकला. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा लक्ष्य आता पहिला भारतीय पुरुष शटलर ठरला आहे. आता तो पदकापासून फक्त एक विजय दूर आहे. लक्ष्यापूर्वी किदाम्बी श्रीकांत (२०१६) आणि पारुपल्ली कश्यप (२०१२) यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. पॅरिसमधून बॅडमिंटन पदकाची भारताची एकमेव आशा सेन आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/38XtFQu
No comments:
Post a Comment