(निलेश झाडे): चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहरात उघडकीस आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना नागभीड न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काल ही घटना उघडकीस आल्यानंतर काही तासातच पोलिसांनी विविध पथके तयार करत पिडीतेची ओळख पटवली होती. मनोरुग्ण असलेली ही महिला जवळच्याच एका गावात आढळली. त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओची तपासणी करून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. नागभीड येथील नागरिकांचा रोष बघता या सर्वांना जवळच्याच तळोधी -बाळापूर येथे पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवण्यात आले होते. या सर्व आरोपींसह एक अल्पवयीन आरोपी देखील या प्रकरणात सामील आहे. दरम्यान पोलिसांनी आज दुपारी या सर्वच आरोपींना न्यायालयापुढे सादर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 28 ऑगस्ट पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन असलेल्या आरोपीला चंद्रपुरात बाल न्याय मंडळापुढे हजर केले गेले. या प्रकरणात व्हिडिओ व्हायरल करण्याप्रकरणी साथीदार कोण व यातील अन्य गुन्हेगारांची माहिती पोलीस काढत आहेत.जिल्ह्यातील नागभीड येथे एका गतीमंद महिलेवर सामूहिक बलात्कारची घटना १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती. पाच आरोपींनी महिला एकटी असल्याचे पाहून तिला बसस्थानकातील प्रसाधनगृहात नेले आणि अत्याचार केला होता. धक्कादायक म्हणजे अत्याचार सुरू असताना त्याचे चित्रीकरण करण्यात आले होते. याचा व्हिडिओ आरोपीने मित्राला पाठवून त्याने तो व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल केला होता. राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला तसेच मुलींवर अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. आज शनिवारी पालघर जिल्ह्यातील वसई येथे एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दुसरी शिकणाऱ्या सात वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. ही घटना नायगाव परिसरात घडली. या घटनेत सोळा वर्षाच्या एका मुलानेच मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली असून त्याला रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे. तो शाळेतील कॅन्टीनमध्ये काम करत होता असे पोलिसांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/4OrVqeJ
No comments:
Post a Comment