नवी दिल्ली : भारतीय महासंघाचे (डब्ल्यूएफआय) माजी प्रमुख ब्रृजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीगीरांची सुरक्षा व्यवस्था दिल्ली पोलिसांनी हटवली होती. याबाबतचा आवाज विनेश फोगटने उचलला होता. याबाबत विनेशने दिल्ली पोलिसांवर आरोपही केला होता. कारण साक्षीदारांचीच सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली होती. पण ही सुरक्षा व्यवस्था का काढण्यात आली होते, याचं खरं कारण आता दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.महिला कुस्तीगीरांची सुरक्षा हटविण्यात आल्याचा दावा कुस्तीगीर हिने गुरुवारी संध्याकाळी 'एक्स'वर केला. 'ब्रृजभूषण यांच्या विरोधात न्यायालयात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीगीरांची सुरक्षा दिल्ली पोलिसांनी काढून घेतली आहे', असे विनेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तसेच, तिने , राष्ट्रीय महिला आयोग आणि दिल्ली महिला आयोगाला टॅगही केले होते. त्यानंतर न्यायालयाने एक अंतरिम आदेश जारी करीत ब्रृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला कुस्तीगीरांना त्वरित पुन्हा सुरक्षा देण्याचे निर्देश शहर पोलिसांना दिले होते.महिला कुस्तीगीरांची सुरक्षा विसंवादातून हटवण्यात आली होती. मात्र, ही चूक दुरुस्त केली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी येथील न्यायालयात दिली. या महिला ब्रृजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात साक्ष देणार आहेत.अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रियांका राजपूत यांनी शहर पोलिसांना ब्रृजभूषण यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीगीरांची सुरक्षा हटवण्यामागील कारणांबाबत शुक्रवारपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार अतिरिक्त सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी महिला कुस्तीगीरांची सुरक्षा केवळ विसंवादातून हटवण्यात आली होती, असे शुक्रवारी स्पष्ट केले. ही चूक दुरुस्त करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. संपूर्ण देशाचे नाही तर जगाचे या गोष्टीकडे लक्ष आहे. पण या प्रकरणात पोलिसांकडून अशा चुका का केल्या जात आहेत, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. साक्षीदारांची सुरक्षा कशी काय हटवली जाऊ शकते, एवढा माफक प्रश्न दिल्ली पोलिसांना पडला नाही का, अशी चर्चा आता क्रीडा विश्वात सुरु झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/5XhZMmS
No comments:
Post a Comment