Breaking

Sunday, August 4, 2024

भारताच्या पराभवाचा कर्दनकाळ ठरलेला जेफ्री व्हँडरसे आहे तरी कोण, जाणून घ्या संपूर्ण माहिती... https://ift.tt/Zekbfrl

कोलंबो : भारतीय संघाने विजयासाठी चांगला पाया रचला होता. पण मैदानात जेफ्री व्हँडरसे नावाचे वादळ घोंघावले. या वादळाने भारतीय संघाला पुरते नेस्तनाबूत केले आणि त्यामुळेच टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली. कारण जेफ्री व्हँडरसेने भारताच्या सहा विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेच्या विजयाचा तो नायक ठरला.जेफ्री हा श्रीलंकेतल्या स्थानिक क्रिकेटमधला हुकमी एक्का समजला जायचा. कारण जेफ्री जेव्हा मैदानात उतरायचा तेव्हा फलंदाजांना तो घाम फोडायचा. आपल्या लेग स्पिनच्या जोरावर जेफ्री हा एकहाती सामना फिरवायचा. त्यामुळे श्रीलंकेतील स्थानिक स्पर्धांमध्ये गाजायला लागला. पण त्याला श्रीलंकेच्या संघात मात्र लवकर स्थान मिळू शकले नाही. कारण जेफ्री हा श्रीलंकेच्या संघात दाखल झाला तो २०१५ साली. त्यावेळी जेफ्रीकडे जास्त खेळाडूंचे लक्ष गेले नाही. त्याची कामगिरी चांगली होत होती, पण त्यामध्ये सातत्य नव्हते. त्यामुळे तो संंघात आत बाहेर होत राहीला.जेफ्री श्रीलंकेच्या टी २० प्रीमीअर लीगमध्ये चांगलाच गाजला आणि ही स्पर्धा त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली, असे म्हणावे लागेल. कारण या स्पर्धेत त्याची कामगिरी उजवी ठरायला लागली. पुन्हा एकदा जुना जेफ्री मैदानात पाहायला मिळू लागला. या लीगमधील नेत्रदीपक कामगिरीमुळे त्याच्यासाठी पुन्हा श्रीलंकेच्या संघाचे दरवाजे उघडले गेले. श्रीलंकेच्या संघात तो दाखल झाला आणि थेट सहा विकेट्स घेत त्याने आपली गुणवत्ता संपूर्ण विश्वाला दाखवली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्धशतकवीर आणि या दोघांनाही त्याॉनेच बाद केले. एकामागून एक सहा विकेट्स मिळवले आणि त्याने भारताचे कंबरडे मोडले. जेफ्रीची गोलंदाजी यावेळी नजरेचे पारणे फेडणारी होती. कारण जेफ्रीचे चेंडू असे काही वळत होते की, त्याची तोड भारताच्या फलंदाजांकडे नव्हती. भारताचे फलंदाज हे फिरकी गोलंदाजी खेळण्यात तरबेज समजले जातात. पण यावेळी मात्र जेफ्रीच्या गोलंदाजीपुढे त्यांना शरणागती पत्करावी लागली. रोहित असो किंवा विराट किंवा या सर्व अनुभवी फलंदाजांना यावेळी जेफ्रीच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करता आला नाही आणि त्यामुळेच भारताला पराभव पत्करावा लागला. जेफ्रीने दुसरा वनडे सामना गाजवला. तो विजयाचा नायक ठरला. आता तिसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडू त्याचा कसा बदला घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्यावेळी जेफ्री नेमकं काय वेगळं करणार, याची उत्सुकता सर्वांना लागलेली असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/1N2L4dl

No comments:

Post a Comment