पुणे: शहरात पावसामुळे रस्त्यांना खड्डे पडले असून त्यांची वहन क्षमता कमी झाली आहे. त्या रस्त्यावरून जड वाहन जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे वाहतूक शाखाने शहरातील महत्वाच्या ३० चौकातून जड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री दहा दरम्यान बंदीचा निर्णय घेतला आहे. या आदेशाची १२ ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. दररोज पडणारा पाऊस, रस्त्यांना पडलेले खड्डे आणि साठलेले पाणी यामुळे सकाळ व सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार वाहतूक पोलिसांनी गर्दी असणारे व महत्वाचे ३० चौक निवडूण त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या जड वाहनांना (डंपर, ट्रक, आर.एम.सी. मिक्सर व इतर) सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत बंदीचा निर्णय घेतला आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी हे आदेश काढले आहेत.
सकाळी नऊ ते रात्री दहा दरम्यान जाण्यास व येण्यास प्रवेश बंद असलेले चौक:
पौड फाटा चौकाकडून कर्वे रस्ता आणि डेक्कन, लॉ कॉलेज रोडकडे, संचेती चौकातून जंगली महाराज रस्त्याकडे आणि गणेशखिंड रस्त्याकडे, कोर्ट रस्त्याकडे, राजाराम पूल येथून डी.पी. रस्त्याकडे, दांडेकर पुलाकडून शास्त्री रस्त्याकडे, निलायम पुलाकडून ना.सी. फडके चौकाकडे, सावरकर पुतळा चौक बाजीराव रस्त्याकडे, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकाकडून जेधे चौकाकडे, सेव्हन लव्हज चौकाकडून जेधे चौकाकडे आणि पंडोल अपार्टमेंट चौक महात्मा गांधी रस्त्याकडे, खाणे मारूती चौकाकडून इस्ट स्ट्रीटकडे, पॉवर हाऊस चौक मालधक्का चौकाकडे, आर.टी.ओ. चौक शाहीर अमर शेख चौकाकडे, पाटील इस्टेट चौक आर.टी.ओ. चौकाकडे, ब्रेमेन चौकाकडून पुणे विद्यापीठ चौकाकडे, शास्त्री नगर- गुंजन चौकाकडे, आंबेडकर चौक सदलबाबा चौकाकडे, चंद्रमा चौक सादलबाबा चौकाकडे, मुंढवा चौक ताडी गुत्ता चौकाकडे, नोबेल चौक भैरोबानाला चौकाकडे, लुल्लानगर भैरोबानाला चौकाकडे, लुल्लानगर गोळीबार मैदान चौकाकडे, लुल्लानगर- गंगाधाम चौकाकडे, पुष्पमंगल चौक ते जेधे चौककडे, राजस सोसायटी महेश सोसायटी चौकाकडे, पोल्ट्री चौक आरटीओ चौकाकडे, उंड्री एनआयबीएम कडे, पिसोळी हडपसर कडे, हांडेवाडी हडपसर कडे, अभिमानश्री चौक, बाणेर रोड पुणे विद्यापीठ चौकाकडे, अभिमानश्री चौक, पाषाण रोड पुणे विद्यापीठ चौकाकडे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/YdHGKT5
No comments:
Post a Comment