Breaking

Monday, August 5, 2024

Manoj Jarange : अशा लोकांना भाव नका देवू; राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर जरांगेंचा मराठ्यांना सल्ला https://ift.tt/6rFJSwW

जालना, संजय आहेर : सध्या विधानसभेच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याचवेळी त्यांनी धाराशिव इथल्या मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंची भेट घेतली यावर प्रतिक्रिया देताना यांनी राज ठाकरेंवर टीका केली. कुणालाही किंमत देऊन आरक्षणासाठी जाब विचारू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी धाराशिव मधील मराठा आंदोलकांना केले आहे. राज ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आरक्षणासाठी जाब विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी ठाकरेंनी मराठा आंदोलकांना भेट नाकारली.यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला.मनोज जरांगे म्हणाले, राजकरण्यांना गोरगरीब मराठ्यांचे काही पडलेले नाही. अशा लोकांना भाव नका देवू, यांच्या तोंडापुढं देखील उभे राहू नका. सर्व राजकरणी पैशावर झोपणारे लोक आहेत यांना भावना आणि आरक्षण काय आहे ते कळत नाही. राजकरणी गोरगरीब मराठ्यांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेतअशी टीका जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

प्रकाश आंबेडकर गोरगरीबाचे नेते

प्रकाश आंबेडकर महामानवाचे वंशंज आहेत त्यामुळे त्यांचा आदर आम्ही करतो. त्यांना आम्ही काहीही बोलणार नाही. त्यांना गरीबाचे नेते म्हणून ओळखले जाते म्हणून त्यांनी गोरगरीब मराठ्यांना समजून घ्यावे. ही इतकीच संधी आहे गोरगरिबांना सत्तेत जाण्याची तर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आमची भावना समजून घ्यावी आणि गोरगरीब मराठ्यांचा पाठीशी उभे राहावे असे मनोज जरांगे यांनी आंबेडकरांनी विनंती केली.

मराठा आंदोलकांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा सोशल मीडियावर मेसेज

तर दुसरीकडे धाराशिव येथील आंदोलनकर्त्यांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. संवाद तुटू द्यायचा नाही ही राजकीय परिपक्वता राजसाहेबांनी दाखवलीच पण आंदोलकांनी देखील संवादाची दारं उघडी ठेवली. महाराष्ट्र आणि मराठी समाज एकसंध रहावा हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची इच्छा आणि हाच आमचा संकल्प देखील असे म्हणत मराठा आंदोलकांच्या भेटीनंतर मनसेने सोशल मीडियावर मत मांडले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/h1mi8vJ

No comments:

Post a Comment