गौरव गुप्ता, मुंबई : बांगलादेशमधील वातावरण सर्वांनीच पाहिले आहे. राजकीय वळणामुळे बांगलादेशमध्ये अहिंसा सुरु झाली आहे. त्यामुळे आता बांगलादेशमध्ये कोणाचं सरकार येणार, कोण सत्तेत येणार, हे अजून ठरलेले नाही. बांगलादेशमधील अराजकता वाढत चाललेली आहे. या गोष्टीचा फटका आता टी २० वर्ल्ड कपलाही बसणार असल्याचे समोर येत आहे.बांगलादेशातील राजकीय-सामाजिक अनिश्चिता आणि अस्वस्थ सामाजिक वातावरणामुळे त्यांच्याकडील टी-२० महिला वर्ल्ड कपचे यजमानपद धोक्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या (आयसीसी) या मानाच्या स्पर्धेचे आयोजन ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान बांगलादेशातील ढाका, सिल्हेत या शहरात अपेक्षित आहे. मात्र तेथील तणावाचे वातावरण बघता दुसरा विचारही करू शकते. आयसीसी बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अन् प्रसंगी योग्य तो निर्णय घेईल, असे आयसीसीकडून सांगण्यात आले. सोमवारी शेख हसिना यांनी बांगलादेशाच्या पंतप्रधानपदावरून पायउतार होत लष्करी हेलिकॉप्टरमधून देशातून पळ काढला आहे. बांगलादेशातील सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्यावरून उसळलेला हिंसाचार सोमवारीही कायम होता. टाइम्स वृत्त समुहाने महिलांच्या टी-२० वर्ल्ड कप आयोजनाबाबत आयसीसीकडे विचारणा केली. ‘आयसीसी बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या संदर्भात बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडूनही वेळोवेळी माहिती घेतली जाते आहे. याशिवाय आयसीसीचे खासगी सुरक्षा सल्लागारही याबाबत सजग आहेत. आयसीसी कायमच सहभागी संघांतील प्रत्येकाच्या सुरक्षेला प्राधान्य देते. यावेळीही आम्ही तेच करू’, असे आयसीसीच्या प्रवक्त्याने टाइम्स समुहाला सांगितले.बांगलादेशसाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. कारण जर त्यांनी हा वर्ल्ड कप यशस्वी करून दाखवला तर त्यांना पुरुषांच्या वर्ल्ड कपचेही यजमानपद दिले जाऊ शकते. त्यामुळे बांगलादेशसाठी ही सर्वात महत्वाची स्पर्धा असेल. त्यामुळे हा वर्ल्ड कप बांगलादेशमध्ये होणार की नाही, हे सर्वात महत्वाचे असेल. यानंतर पुरुषांचा टी २० वर्ल्ड कपही होणार आहे. त्यासाठी ही स्पर्धा बांगलादेशसाठी महत्वाची असेल. यावेळी बांगलादेशला मदत करू शकतो. पण आता कोणतं पाऊल उचलते ते महत्वाचं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/B6vFwMp
No comments:
Post a Comment