पॅरिस : भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकचा ११ दिवस सर्वात महत्वाचा असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी महाराष्ट्राचा सुपूत्र हा मैदानात उतरणार आहे. गेल्यावेळी अविनाशने दमदार कामगिरी केली होती, पण पदकान मात्र त्याला हुलकावणी दिली होती. त्यामुळे यावेळी अविनाश भारतासाठी पदक जिंकतो का, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे. त्याचबरोबर भारताला सोमवारी पदक जिंकवून देऊ शकतो. पण सोमवारी भारताचे कोणते खेळाडू मैदानात उतरणार आणि त्यांचे सामने कधी होणार, याचे संपूर्ण वेळापत्रक आता समोर आले आहे.
नेमबाजी
- स्कीट मिश्र सांघिक (माहेश्वरी चौहान आणि अनंत जीत सिंग नारुका) पात्रता फेरी ः दुपारी १२.३० वाजता.टेबल टेनिस
- महिला सांघिक (वि. रुमानिया) उपउपांत्यपूर्व फेरी ः दुपारी १.३० पासूनसेलिंग
- महिला डिंगी (नेत्रा सर्वारन) स्पर्धेतील नववी आणि दहावी शर्यत ः दुपारी ३.४५ वाजता.- पुरुष डिंगी (विष्णू सर्वानन) स्पर्धेतील नववी आणि दहावी शर्यत ः संध्याकाळी ६.१० वाजता.अॅथलेटिक्स
- महिला ४०० मीटर (किरण पहल) धावणे, प्राथमिक फेरी ः दुपारी ३.५० वाजता.- पुरुषांची तीन हजार मीटर स्टीपलचेस (अविनाश साबळे), प्राथमिक फेरी ः रात्री १०.५० वाजता.बॅडमिंटन
- पुरुष एकेरी (लक्ष्य सेन) ब्राँझ पदकाची लढत ः संध्याकाळी ६ वाजता.लक्ष्य सेनला रविवारी पदक जिंकण्याची चांगली संधी होती. पण उपांत्य फेरीत त्याला डेन्मार्कच्या विक्टरकडून पराभूत व्हायला लागले. त्यामुळे त्याला आता कांस्यपदक पटकावण्याची संधी सोमवारी असणार आहे. कारण सोमवारी त्याची कांस्यपदकासाठी लढाई होणार आहे. त्यामुळे भारताला सोमवारी चौथे पदक मिळते का, यावर सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील.महाराष्ट्राचा अविनाश साबळे या ऑलिम्पिकमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे तमाम क्रीडा विश्वाचे लक्ष लागलेले असेल. कारण अविनाश साबळेने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी त्याला ऑलिम्पिक पदक जिंकता आलेले नाही. त्यामुळे तो यावेळी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भराताला सोमवारी फक्त एकच पदक मिळू शकते. हे पदक लक्ष्य सेनच्या रुपात असू शकते.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/vZjYwJ8
No comments:
Post a Comment