Breaking

Friday, August 2, 2024

Paris Olympics Day 9 Schedule: नवव्या दिवशी मनू भाकरला हॅटट्रिकची संधी, भारतासाठी स्पेशल दिवस; असे आहे संपूर्ण वेळापत्रक https://ift.tt/15Un2Zb

पॅरिस: सर्वोत्तम पूर्वतयारी, एकाग्रता, विजय आणि ‘सेलिब्रेशन’ सारे काही सफाईदार... नेमबाज मनू भाकरसाठी यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील हा जणू शिरस्ताच झाला आहे. आज, शनिवारी तिला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या हॅटट्रिकची संधी आहे. तिने २५ मीटर पिस्तूलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. लक्ष्य सेननेही उपउपांत्य फेरीत विजय मिळवत आगेकूच केली. पी. व्ही. सिंधू, सात्त्विक-चिराग, निखत झरीन अशा पदकाच्या दावेदार असणाऱ्या खेळाडूंच्या पराभवामुळे आलेली निराशा दूर झाली ती मनूची अंतिम फेरी आणि भारतीय हॉकी संघाच्या ऑस्ट्रेलियावरील विजयामुळे.पॅरिस ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारतासाठी समाधान आणि दिलासा देणारे निकाल आले. गुरुवारी पदकाचे दावेदार असणारे अनेक खेळाडूंचा झालेला पराभव यामुळे भारतीय चाहते नाराज झाले होते. मात्र शुक्रवारी मनू भारकने अंतिम फेरीत धडक मारली त्यानंतर भारतीय हॉकी संघाने तब्बल ५२ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि ग्रुपमध्ये दुसरे स्थान मिळवले. भारताने गेल्या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा ३-२ असा पराभव केला. त्यानंतर लक्ष्य सेनने उपउपांत्य फेरात प्रवेश केला. आता तो पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

असा असेल भारताचा पॅरिस ऑलिम्पिकमधील ९ दिवस

नेमबाजी महिला - स्कीट - पात्रता फेरी -रैझा ढिल्लन आणि माहेश्वरी चौहान - दु. १२.३० पासूनमहिला - २५ मीटर पिस्तूल (पदक फेरी) - मनू भाकर - दु. १ पासून तिरंदाजीमहिला - वैयक्तिक (बाद फेरी) - दीपिकाकुमारी वि. मिचेल क्रोप्पेन (जर्मनी) - दु. १.५२ पासूनमहिला - वैयक्तिक (बाद फेरी) - भजन कौर वि. दिआंदा चोरुनिसा (इंडोनेशिया) - दु. २.०५ पासून सेलिंगपुरुष - रेस ५ - विष्णू सरवानन - दु. ३.४५ पासूनपुरुष - रेस ६ - विष्णू सरवानन - दु. ४.५३ पासूनमहिला - रेस ५ - नेत्रा कुमानन - सायं ५.५५ पासूनमहिला - रेस ६ - नेत्रा कुमानन - सायं. ७.०३ पासून बॉक्सिंगपुरुष - उपांत्यपूर्व फेरी - निशांत देव वि. मार्को व्हेर्दे (मेक्सिको) - मध्यरात्री १२.१८ पासून


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/PQ4Zohb

No comments:

Post a Comment