Breaking

Tuesday, September 24, 2024

नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! आंतरराष्ट्रीय विमानतळावर 5 सप्टेंबरला एअरफोर्स विमानाची चाचणी होणार https://ift.tt/bLyCvBP

नवी मुंबई : सिडकोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पा पैकी एक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे काम सुरु आहे. मार्च २०२५ मध्ये या विमानतळावरुन देशांतर्गत विमान सेवा करण्याच्या दृष्टीने काम प्रगतीपथावर आहे. येत्या ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एअरफोर्सच्या विमानाची चाचणी करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सिडकोचे अध्यक्ष आमदार संजय शिरसाट यांनी दिली. सिडको अध्यक्ष झाल्यानंतर आमदार शिरसाट यांनी आज मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या प्रसंगी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल व दिलीप ढोले, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ) गीता पिल्लई, विमानतळ प्रकल्प मुख्य अभियंता शीला करुणाकरन, अदानी समुहाचे अधिकारी आदी उपस्थित होते.या विषयी माहिती देताना शिरसाट म्हणाले की, सिडकोतर्फे ११६० हेक्टर क्षेत्रावर, दोन टप्प्यांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वांत मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ साकारण्यात येत आहे. मुंबई विमानतळा पेक्षाही अधिक प्रगतीशील सोयी सुविधांचे हे विमानतळ आहे. नुकतीच विमानतळ प्रकल्पस्थळी भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेली सिग्नल चाचणी व इन्स्ट्रूमेंट लँडिंग सिस्टीम चाचणी यशस्वीरीत्या पार पडली असून येत्या ५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एअरफोर्स विमानाची लॅण्डींगची चाचणी करण्याच्या अनुषंगाने नियोजन सुरु आहे. तर मार्च २०२५ च्या पहिल्या आठवडयात विमानतळावरून देशांतर्गत (डोमेस्टीक) विमान सेवा सुरु करण्याच्या असून सुरु असणारे काम त्या गतीने सुरु असल्याने हा प्रकल्प वेळेत पुर्ण होणार असल्याचे अध्यक्ष आ.शिरसाट म्हणाले आहेत. मार्च २०२५ मध्ये देशांतर्गत विमानसेवा सुरु झाल्यानंतर जून महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करण्यासाठी उद्दिष्ट पुर्ण होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मार्चमध्ये विमानतळावरुन पहिले विमान उड्डाण घेणार

सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा राष्ट्रीय दृष्टीकोनातून महत्त्वाचा प्रकल्प आहे. नवी मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विकासाकरिता हा प्रकल्प योगदान देणार आहे. प्रकल्पाच्या कामाची प्रगती समाधानाकारक आहे. नियोजित वेळेत कामे पुर्ण करण्याचे संबंधितांना निर्देश दिले आहेत. मार्चमध्ये विमानतळावरुन पहिले विमान उड्डाण घेईल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/JFKAMpx

No comments:

Post a Comment