मुंबई : या आठवड्याच्या सोमवारपासून मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केले आहे. मात्र अचानक आलेल्या पावसाने बळराजांसह अनेकांची भंबेरी उडाली आहे. राज्याची आर्थिक राजधानी कालपासून ढगाच्या गडगडांटासह मुसळधार पाऊस कोसळत आहेत. परिणामी आज पावसाचा थेट परिणाम मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलवर सुद्धा झाला आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचत असल्याने रेल्वेच्या रुळावर सुद्धा पाणी साचू लागले आहे. ऐन संध्याकाळच्या वेळी पावसाने पुन्हा जोर धरला आहे. परिणामी मध्य आणि पश्चिम रेल्वे उशीराने धावत आहेत. यासह रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली आहे.
रेल्वे अपडेट काय?
शहरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाचा फटका लोकल ट्रेनला बसला असून भांडुप ते कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकल सेवा आणि एक्सप्रेस गाड्या काही वेळापासून बंद आहेत. तशा प्रकारची घोषणा दादर स्टेशनवर करण्यात आली आहे. पावसामुळे घाटकोपर स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसतंय. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहे. तर पश्चिम रेल्वे २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहे. विक्रोळी, कांजूर, भांडुप या स्टेशन दरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे घाटकोपर स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/jRzdkDF
No comments:
Post a Comment