Breaking

Saturday, September 14, 2024

नायर रुग्णालयातील प्राध्यपकाचे BMC कडून निलंबन, विद्यार्थिनीकडून झालेला लैंगिक छळाचा आरोप https://ift.tt/tYhVHUl

मुंबई : मार्चमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नायर रुग्णालयातील एका प्राध्यापकाला निलंबित केले आहे. रुग्णालयाच्या अंतर्गत तक्रार समितीने शिक्षकाला दोषी ठरवून सुरुवातीला त्याच्या बदलीची शिफारस केली होती. त्यानंतर बीएमसीने त्यांना निलंबित करण्याचा आणि पालिका मुख्यालय स्तरावर पुढील चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या आठवड्यात, रुग्णालय-स्तरीय तक्रार समितीने निष्कर्ष काढला की विद्यार्थ्याने एमबीबीएसचा अभ्यासक्रम पूर्ण करेपर्यंत आरोपी शिक्षकाची बदली करावी. सुरुवातीला त्यांना केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. तथापि, शनिवारी बीएमसीने बीएमसी मुख्यालयातील लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या अंतर्गत अधिक सखोल चौकशी होणार असल्याची घोषणा केली.बीएमसीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "या लैंगिक छळाच्या तक्रारीप्रकरणी आणखीही काही तक्रारी प्राप्त झाल्यामुळे, या प्रकरणाचा तपास बीएमसी मुख्यालय-स्तरीय 'लैंगिक छळ प्रतिबंध समिती'कडे वर्ग करण्यात आला आहे, जेणेकरून घटनेचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शकपणे होऊ शकतो."विद्यार्थ्याने सुरुवातीला छेडछाडीची घटना मार्चमध्ये रुग्णालय-स्तरीय तक्रार समितीला कळवली. चौकशीनंतर, समितीने आरोपी डॉक्टरच्या बदलीचे आदेश दिले. याशिवाय, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी एका वैद्यकीय शिक्षकाला एक इशारा पत्र सुद्धा मिळाले . डीन डॉ. सुधीर मेढेकर यांनी सुद्धा या प्रकरणात चालढकल भूमिका दाखवली असे रुग्णालयस्तरीय तपास कमिटीकडून सांगण्यात आले. त्यामुळे तपास आता आणखी थेट बीएमसीच्या तपास यंत्रणेद्वारे होणार आहे. शनिवारी राष्ट्रवादीच्या (शरद) खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संबोधित करत सुळेंनी डॉ. सुधीर मेढेकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तत्पूर्वी, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/YxtkqFZ

No comments:

Post a Comment