Breaking

Friday, September 13, 2024

नीरज चोप्रा आणि अविनाश साबळे यांचा डायमंड लीगमध्ये लागणार कस, भारतीयांच्या सोनेरी अपेक्षा https://ift.tt/27zvWYM

ब्रुसेल्स : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा डायमंड लीग फायनलमध्ये सहभागी झाला आहे. डायमंड लीग फायनल ही दोन दिवसीय स्पर्धा आज, शनिवारपासून सुरू होत आहे. त्याच्याकडून भारताला आशा आहे. नीरजसह या स्पर्धेत तीन हजार मीटर स्टिपलचेसमधील धावपटू अविनाश साबळेही आपले कौशल्य पणाला लावणार आहे. त्याच्यासाठी हा अनुभव मोलाचा ठरणार आहे. डायमंड लीगच्या फायनलमध्ये प्रथमच दोन भारतीय खेळाडू सहभागी झालेले आहेत.या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे नीरजचा कस लागणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरजला पॅरिसमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. शनिवारी नीरज मोसमाची अखेर सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक असेल. डायमंड लीगच्या गुणतक्त्यात नीरच चोप्रा चौदा गुणांसह चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. नीरजचे डायमंड लीगच्या अखेरच्या टप्प्यातून माघार घेतली होती. सध्या तो दुखापतीतून सावरत आहे. त्याचे ९० मीटरचा टप्पा ओलांडण्याचे ध्येय असेल.अविनाश साबळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अकराव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तो डायमंड लीगमध्ये पहिल्यांदाच सहभागी होत आहे. येथून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा नसल्या तरी सर्वोत्तम कामगिरीवर त्याचा भर असणार आहे. त्याची स्पर्धा शुक्रवारी होत आहे. डायमंड लीगच्या गुणतक्त्यात अविनाश चौदाव्या क्रमांकावर राहिला होता. मात्र, त्याच्यापेक्षा क्रमवारीत पुढे असलेले लामेचा गिरमा, जिओर्डी बीमिश, आरयुजी मुरा, हिलरी बोर यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अविनाशला संधी मिळाली आहे. २९ वर्षीय अविनाशने पॅरिसमधील डायमंड लीगच्या टप्प्यात सात जुलैला ८ मिनिटे ०९.९१ सेकंद अशी वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम रचला होता. यानंतर सिलेसिया लेगमध्ये तो चौदाव्या क्रमांकावर राहिला होता. त्याने ८ मिनिटे २९.९६ सेकंद वेळ नोंदवली होती. डायमंड लीग फायनलमधील विजेत्या डायमंड ट्रॉफी आणि ३० हजार डॉलरचे पारितोषिक देण्यात येते. या स्पर्धेत नीरज आणि अविनाश कशी कामगिरी करतात, याकडे तमाम क्रीडा विश्वाचे लक्ष आता लागलेले असणार आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/Md2KWfG

No comments:

Post a Comment