Breaking

Sunday, September 8, 2024

भारताचा फक्त एकाच कसोटीसाठी संघ का जाहीर करण्यात आला, समोर आलं सर्वात मोठं कारण... https://ift.tt/IzsAh2R

नवी दिल्ली : भारताचा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकीतल पहिल्या सामन्यासाठी फक्त संघ जाहीर करण्यात आला. पण यावेळी फक्त एकाच कसोटीसाठी संघ का जाहीर करण्यात आला, हा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. पण बीसीसीआयने असं का केलं, याचं कारणही आता समोर आले आहे.

भारत आणि बांगालेदशमध्ये नेमके किती सामने होणार आहेत...

भारत आणि बांगालदेश यांच्यात दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यामधील पहिला सामना हा १९ ते २३ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. हा सामना चेन्नईत रंगणार आहे. त्यानंतर भारताचा दुसरा सामना हा कानपूर येथे रंगणार आहे. हा सामना २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. पण बीसीसीआयने आता फक्त पहिल्याच सामन्यासाठी आपला संघ जाहीर केल्याचे समोर आले आहे. या कसोटी मालिकेनंतर तीन टी २० सामन्यांची मालिकाही भारतात खेळवली जाणार आहे.

बीसीसीआयने फक्त पहिल्या सामन्यासाठीच का संघ जाहीर केला...

यांच्या निवड समितीने आता फक्त एकाच कसोटी सामन्यासाठी संघ का जाहीर केला, याचे उत्तम यांच्या नियमांत आहे. गौतम गंभीर यांनी सांगितले होते की, स्थानिक क्रिकेटच्या कामगिरीच्या जोरावरच खेळाडूंना संघात स्थान मिळेल. सध्याच्या घडीला देशात दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना झाला आहे. पण या स्पर्धेतील अजून दोन सामने बाकी आहे. ही स्पर्धा २२ सप्टेंबरला संपणार आहे. जेव्हा पहिला कसोटी सामना सुरु असणार आहे. त्यामुळे या दुलीप ट्रॉफीमध्ये जे खेळाडू सरस कामगिरी करतील त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात संधी मिळू शकते. त्यामुळे यावेळी फक्त एकाच कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ निवडण्यात आल्याचे म्हटले जात आहे.भारत आण बांगलादेश यांच्यात बऱ्याच दिवसांनी मालिका पाहायला मिळणार आहे. भारत बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरणार आहे. पण भारताला जरा जपून खेळावे लागेल. कारण बांगलादेश पाकिस्तानला त्यांच्यात मातीत पराभूत करून आली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/PWqOiMm

No comments:

Post a Comment