नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी हा जगातील महान कर्णधार मानला जातो. पण कोहलीच्या मास्टर प्लॅनपुढे धोनीही फेल झाला होता, असा किस्सा आता भारतीय संघात निवड झालेल्या यश दयालने सांगितला आहे.
नेमकं घडलं तरी काय होतं...
ही गोष्ट आहे २०२४ या वर्षातीलच. आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनी जलवा सुरु होता. धोनीला जेवढा पाठिंबा मिळत होता, तेवढा कोणालाही मिळत नव्हता. प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानातही धोनीच्या नावाचा गजर ऐकायला मिळायचा. धोनी पण तेव्हा भन्नाट फॉर्मात होता. धोनी अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजीला यायचा आणि जोरदार फटकेबाजी करायचा. त्यामुळे मैदान दणाणून जायचे. समोरच्या संघावरही त्याचे दडपण यायचे. त्यामुळे धोनीला बाद करणे हे सर्वात कठीण काम होऊन बसले होते.आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामना सुरु होता. धोनी फलंदाजीला आला होता. यश दयाल त्यावेळी गोलंदाजी करत होता. यशच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने गगनभेदी षटकार लगावला होता. त्यामुळे यशवरचे दडपण वाढलेले होते. धोनी एका मारायला लागला की तो थांबत नाही. त्यामुळे आता पुढे काय होणार, हा पश्न यशलाही पडलेला होता. त्यावेळी विराट त्याच्या मदतीला धावून आला.यश म्हणाला की, " धोनीने माझ्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला होता. त्यामुळे आता पुढे काय करायचे, याचा विचार मी करत होतो. त्यावेळी विराट कोहली माझ्याजवळ आला. मला म्हणाला, पहिल्या चेंडूवर षटकार लागला आहे. पण त्याचे दडपण घेऊ नकोस. धोनीला वेगवान चेंडू खेळायला जास्त आवडतात. त्यामुळे त्याला बाद करायचे असेल तर चेंडूचा वेग कमी ठेव. कोहली माझ्याजवळ आला आणि जे काही म्हणाला त्यामुळे मला धीर आला. त्यावेळी कोहलीने जे मला सांगितले तेच मी केले आणि मला यश मिळाले."विराट कोहलीने धोनीला बाद करण्यासाठी जो प्लॅन सांगितला होता, तो यशस्वी ठरला होता. कारण यशने कोहलीने सांगितले तसेच केले आणि त्याला धोनीला लगेच बाद करता आले होते.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/8bnmGh6
No comments:
Post a Comment