मुंबई : राज्यासह संपूर्ण देशभरात गणपती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सर्वसामान्य जनतेपासून तर अगदी राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी बाप्पाकडे मागणं मागितले आहे. अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बाप्पाकडे व्यक्त केली आहे. अशातच आता भाजपच्या यांनी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.
चित्रा वाघ काय म्हणाल्या?
चित्रा वाघ म्हणाल्या की, '' देवेंद्र फडणवीस हे एक व्हिजन असणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने विकासकामांमध्ये आणि प्रगतीमध्ये एक नंबर गाठला आहे. जात पात बाजूला ठेऊन काम करणारा आमचा नेता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये भाजपच्या जास्तीत जास्त जागा निवडणून येऊ द्या. आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी बाप्पाने द्यावी अशी इच्छा आमची आहे. असं मागणं चित्रा वाघ यांनी बाप्पाकडे मागितले आहे.अमोल मिटकरींनी अजित पवारांसाठी व्यक्त केली इच्छा
चित्रा वाघ यांच्या अगोदर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा गणपतीकडे व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ''सालाबाद प्रमाणे याही वर्षी माझ्या घरी गणपतीचा उत्सव आहे. सर्व धर्म समभाव जपणारा आमचा गणपती आहे. सर्व समाजाची मुलं आमच्या गणपती उत्सवात सहभागी होतात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहाव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. त्यामध्ये महिलांसाठी ई -पिंक रिक्षा योजना आहे. मोफत शिक्षणाची सुविधा आहे. शेतकऱ्यांना मोफत विजबील आहे. आणि सर्वात महत्वाची लाडकी बहिण योजना राबवण्यात आली आहे. याच योजनेच्या भरवश्यावर 2024 ची विधानसभा निवडणूक जिंकून अजितदादा पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होतील आणि बाप्पाची पूजा करतील.असं मिटकरी म्हणाले आहेत. दरम्यान, थोड्याच दिवसांत राज्यात विधान सभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून दावे प्रतीदावे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/sHOAJu5
No comments:
Post a Comment