Breaking

Friday, September 6, 2024

रिक्षाचालकांची अरेरावी थेट खाकीवर उचलला हात! व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर संतापाची लाट https://ift.tt/IoZxJmT

, प्रदीप भणगे : उल्हासनगरमध्ये दिवसंदिवस गुन्हेगारी प्रमाण वाढत चालले आहे. राज्यात सध्या सणासुदीचे वातावरण आहे. ठिकठिकाणी गणरायांचे आगमन होत आहे. वाहतूक पोलीसांवर शहराच्या सुरक्षेची आणि वाहतूक कोंडी सोडवण्याची मोठी जबाबदारी पडली आहे. अशातच एका वाहतूक पोलीसाच्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. उल्हासनगरमध्ये रिक्षा चालकाने मद्यपान करून एका युवतीला धडक दिल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर मोहन पाटील घटनास्थळी पोहोचले. पण वाहतूक पोलीस पाटील रिक्षा चालकाला मध्यवर्ती पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना वाहतूक पोलिसाला दोन रिक्षा चालकाने मारहाण केली. यात वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. पोलीसाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून रिक्षा चालक आणि साथीदारावर कठोर करवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.

काय घडली घटना...

ऐन गर्दीच्या वेळई उल्हासनगर कॅम्प ३ मध्ये रिक्षा चालक आणि एका महिलेचा वाद सुरू होता. संबंधित घटनेमुळे आजूबाजूच्या भागात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलीसाला सदरची बाब कळताच त्यांनी भांडण सोडवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी वाहतूक पोलीस मोहन पाटील यांनी आणि महिलेमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलीसाने रिक्षा चालकाची विचारपुस केली असता रिक्षा चालक मद्यधुंद असल्याचे पोलीसाच्या लक्षात आले. त्यानंतर रिक्षा चालक वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालू लागला. पोलीसाने अखेर हुज्जत थांबवत रिक्षा चालकाला पोलीस स्टेशनला घेवून जाण्यासाठी निघाले. पण वाहतूक पोलीस रिक्षा चालकाला पोलीस स्टेशनला नेत असताना. रिक्षा चालकाच्या दोन रिक्षा चालकच मित्रांनी वाहतूक पोलीस मोहन पाटील यांना मारहाण केली. त्यानंतर गुन्हेगार रिक्षा चालकाने पोलीस मोहन पाटील यांना बेदम मारहाण केली. संपूर्ण मारहाणीत मोहन पाटील जमिनीवर कोसळले. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पण सोशल मीडियावर वाहतूक पोलीसाच्या मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. याआधी सुद्धा राज्यात अनेकदा वाहतूक पोलीसांना फरफटत नेणे, वाहतूक पोलीसांना धडके देणे किंवा त्यांचावर हात उगारणे अशा घटना झाल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात अशी घटना घडल्याने सगळीकडून संताप व्यक्त होत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/dzjNvWT

No comments:

Post a Comment