विनायक राणे : भारताच्या सुमीत अंतीलने पॅरालिम्पिकमधील भाला फेक प्रकारात पटकावले. पण सुमीतच्या या यशात नीरज चोप्राचाही महत्वाचा वाटा होता. भारताचा दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा हा सुमीतशी महिना, पंधरवड्यातून एकदा संवाद साधतो. भालाफेकीचे तंत्र, सरावातील गोष्टी आणि सूचना अशा संदर्भात या गप्पा रंगतात. पॅरिस पॅरालिम्पिकआधीही नीरजने सुमीतला एक महत्त्वाची सूचना केली होती. ‘पॅरिसमध्ये माहोल खूप छान आहे. फक्त भालाफेकीत नवे काहीच करू नकोस. जे आधीपासून करत आला आहेस तेच कर. नवे प्रयोग व्यर्जच’, असा सल्ला नीरजने दिल्याचे सुमीत म्हणाला. ‘पॅरालिम्पिकसारख्या स्पर्धेत ऐनवेळी अस्वस्थपणा (नव्हर्स) जाणवू शकतो. अशावेळी लक्षविचलीत होण्याची भितीही असते. अशावेळी आपल्याच तंत्रात नवा प्रय़ोग केल्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे नीरजने माझ्या सहाय्यकांमार्फत मला हा संदेश पाठिवाल होता. एरव्हीदेखील महिन्यातून एकदा तरी आम्ही संवाद साधतोच’, अशी माहिती सुमीतने दिली.भारताचा पॅराभालाफेकपटू सुमीत अंतिलने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक राखले. सलग दोन पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदके पटकावणे नक्कीच सोपी गोष्ट नाही. यासाठी त्याने आवडत्या गोड पदार्थांवर पाणी सोडलेच; पण पाठदुखी सोसत सुवर्ण राखण्याची किमयाही केली. यासाठी त्याने स्पर्धेआधी वेदनाशामक गोळी घेतली होती. जवळपास वर्षभरापेक्षा जास्त काळ सुमीत पाठदुखीनेही त्रस्त आहे. त्यावर उपचार घेताना मुबलक विश्रांतीचीही आवश्यकता असते, पण लागोपाठच्या स्पर्धा आणि पॅरिस पॅरालिम्पिकची पूर्वतयारी यामुळे त्याने या पाठ आणि कंबरदुखीकडे एकप्रकारे कानाडोळाच केला. सुमीतने गेल्यावर्षी पॅराएशियाडमध्ये सुवर्ण पदक पटकावले तेदेखील दुखऱ्या पाठिच्या वेदना सोसतच. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक राखणारा तो दुसरा भारतीय आणि पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. सुमीतने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ६८.५५ मीटरच्या भालाफेकीसह सुवर्णपदक पटकावले होते. तोच स्वतःचा विक्रम सुमीतने पॅरिसला मोडीत काढला. पाठदुखीतून पूर्ण सावरण्याचे सुमीतचे ध्येय आहे. ‘घरी परतलो की पाठीवर उपचार घेणार आणि मुबलक आराम करणार. मी अजूनही शंभर टक्के फिट नाही. पुरेशी विश्रांती घेणे हा पाठदुखीवरील सर्वांत चांगला उपाय आहे’, असे सुमीत म्हणाला. स्पर्धांच्या व्यग्र कार्यक्रमामुळे त्याला पुरेसा आराम करता आला नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/HdqTBKG
No comments:
Post a Comment