Breaking

Thursday, September 5, 2024

Maratha Protest : 'त्या' दोन कारणांसाठी सोलापूर आणि पुणे काँग्रेस कार्यालयासमोर मराठा आंदोलन https://ift.tt/W8xivN9

मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काँग्रेस भवनासमोर दोन दिवसांपासूनआमरण उपोषण सुरू केले आहे. काँग्रेस नेत्यांच्या साखर कारखान्यात शेतकऱ्यांनी ऊस दिला होता. वर्ष उलटून गेले तरीही शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळाले नाहीत. शेतकऱ्यांना साखर कारखान्याच्या संचालक मंडळाकडून नेहमी आश्वासने दिली जातात. हजारो शेतकऱ्यांची बिल आजतागायत मिळाली नाही,त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी सोलापूर शहरातील समोर आमरण उपोषणाला सुरुवात केले आहे. आंदोलकांची गर्दी वाढत चालेली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन ठिकाणी येऊन मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठींबा दिला आहे. मराठा समाजाचा पाठिंबा मिळाल्याने आंदोलन ठिकाणच्या शेतकऱ्यांत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे सोमनाथ राऊत यांनी माहिती देताना सांगितले,सोलापूर काँग्रेस भवन समोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची माहिती पाटील यांच्याकडे देणार आहोत,मनोज जरांगे पाटील यांना सोलापुरात बोलावण्याचा प्रयत्न करू असे सोमनाथ राऊत यांनी सांगितले.

मनोज दादा आम्हाला न्याय द्या;.हशेतकऱ्यांची आर्त हाक..

अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची कैफियत ऐकून थेट कृषी मंत्र्याना कॉल केला होता. सोलापूर काँग्रेसभवन समोर बसलेल्या शेतकऱ्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आर्त हाक दिली आहे.मनोज दादा आम्हाला न्याय द्या,आमचं ऊस घेऊन आम्हाला पैसे देत नाहीत,आमची मदत करा,अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.

मराठा आरक्षण द्या काँग्रेसकडे मागणी...

तर दुसरीकडे आजच मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे मराठा समाजाने पुण्यात केली आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात आंदोलन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना घेराव घालून, आंदोलकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याची मागणी केली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या प्रकरणी तोडगा काढू, असे आश्वासन पटोले यांनी दिले आहे. काँग्रेस भवन येथे पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य वरिष्ठ पदाधिकारी काँग्रेस भवनमध्ये आले होते. दुपारच्या सुमारास अचानक मराठा समाजाचे कार्यकर्ते येथे आले आणि त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. अध्यक्षांच्या दालनात बसलेले पटोले यांच्याकडे जात त्यांना घेराव घालून या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी केली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/GhU1kVy

No comments:

Post a Comment