Breaking

Monday, September 23, 2024

त्या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळायला हवं होत; हसन मुश्रीफ यांची टीका https://ift.tt/LHfJEYB

कोल्हापूर (नयन यादवाड): राजकीय विद्यापीठ असलेल्या कागल तालुक्यात मुश्रीफ आणि घाटगे वाद कागलच्या जनतेला नवा नाही. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी यांनी तुतारी हातात घेतल्याने मुश्रीफ यांना ही निवडणूक काहीशी जड जाणार आहेच. मात्र सध्या दोघांनी देखील मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. काल समरजीत घाटगे यांनी पुण्यात मतदारसंघातील मतदारांचा मेळावा भरवला होता या मेळाव्याला सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी भाषणात सुप्रिया सुळे यांनी कोल्हापूरचा कौतुक तर केलं मात्र यांच्यावर देखील आपले तोफ डागली. कागलध्ये ईडी पोहोचल्यानंतर घरातील पुरुष मागे बसले होते. मात्र, घरातील महिला पुढे आली होती अशा शब्दात मुश्रीफांवर त्यांनी टीका केली. दरम्यान या टीकेला आता मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कागल विधानसभा मतदार संघातील पुणे मुंबई येथे काम करणाऱ्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी समरजीत घाटगे आणि हसन मुश्रीफ दोघांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. काल रविवारी हसन मुश्रीफ यांच्याकडून मुंबईमध्ये कागल,गडहिंग्लज मतदारसंघातील लोकांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. तर दुसरीकडे समरजिसिंह घाटगे यांनी सुद्धा पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर ईडी कारवाईवरून टीका केली. यानंतर हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात सुप्रिया सुळे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले, कागलमध्ये ईडी प्रकरण कोणामुळे झालं याची माहिती सुप्रियाताई सुळे यांनी घ्यायला हवी होती. त्या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळायला हवं होत. अशा शब्दांमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी समरजिसिंह घाटगे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. तसेच मुंबईमध्ये हसन मुश्रीफ यांनी आपला झालेला मेळावा न भूतो न भविष्यती झाला. दर निवडणुकीत मी मुंबई मध्ये कार्यकर्त्यांच मेळावा घेत असतो. माझ्या मतदार संघातील वीस हजार मतदार मुंबईत राहतात. मुंबईमधील मेळाव्यासाठी तीन हजारावर लोक येणं अपेक्षित होतं. मात्र 5 हजारांवर लोक आल्याने थोडीशी गैरसोय झाली. गावामध्ये झालेली कामं त्यांनी पाहिलं आहे असे मुश्रीफ म्हणाले आहेत. संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं यामध्ये काही तथ्य नाहीदरम्यान संजय राऊत यांनी महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न सुरु असल्याचा दावा केला असून याबाबत मुश्रीफ यांना विचारले असता संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं यामध्ये काही तथ्य नाही. आम्ही विधानसभा तिन्ही पक्ष मिळून लढणार आहोत. हे एकनाथ शिंदे, देवेन्द्र फडणवीस आणि अजितदादा यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. त्यामुळे ज्या काही बातम्या येत आहेत त्यात काही तथ्य नाही. तिन्ही नेते बैठकीला बसतील आणि आणि त्यानंतर कुणाला किती जागा मिळतील हे ठरवलं जाईल असे ही मुश्रीफ म्हणाले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/WleRMEn

No comments:

Post a Comment